त्रयस्थ यंत्रणेमार्फत फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:07+5:302021-04-28T04:44:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एमएमआर क्षेत्रामधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट ...

Fire, oxygen, structural audit through third party system | त्रयस्थ यंत्रणेमार्फत फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडिट

त्रयस्थ यंत्रणेमार्फत फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडिट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एमएमआर क्षेत्रामधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट त्रयस्थ तज्ज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मंगळवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एमएमआर क्षेत्रामधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत व्हीसीद्वारे बैठक पार पडली. यावेळी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा तसेच, ऑक्सिजन, रेमडेसिविर उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना शिंदे यांनी केली.

उन्हाळा सुरू झाल्याने एसी आणि व्हेंटिलेटर यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी फायर ब्रिगेड तैनात करण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. अनेकदा रात्री-अपरात्री खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या घटना वारंवार घडतात. या घटना टाळण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळविणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. कोविड केअर सेंटरमधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

एमएमआर क्षेत्रामधील काही महापालिकांच्या भागातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदविले. मात्र तरीही ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून हे प्लांट कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.

.......

Web Title: Fire, oxygen, structural audit through third party system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.