ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग: लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:50 PM2020-09-30T21:50:07+5:302020-09-30T21:54:05+5:30

ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत कागदपत्रे, फर्निचर आणि विक्रीचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Fire at Raymond Company office in Thane: Loss of millions | ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग: लाखोंचे नुकसान

ठाणे महापालिकेच्या पाच अग्निशमन दल केंद्राने केले शर्थीचे प्रयत्न

Next
ठळक मुद्देसुदैवाने जीवितहानी टळलीठाणे महापालिकेच्या पाच अग्निशमन दल केंद्राने केले शर्थीचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कागदपत्रे, फर्निचर आणि विक्रीचे कपडे जळून खाक झाले. ठाणे अग्निशमन दलातील पाचही केंद्रातील जवानांनी दोन तासांमध्ये शर्थीचे प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोखरण रोड क्रमांक एक येथील रेमंड कंपनीच्या कंम्पाऊडमधील मुख्य फॅक्टरी लगत असलेल्या कॅन्टीन समोरील कार्यालयात बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह पाचपाखाडी, जवाहरबाग, बाळकूम, वागळे इस्टेट आणि कोपरी येथील अग्निमन दल केंद्रातील जवानांनी स्थानक अधिकारी आर. पी. राऊत आणि उपस्थानक अधिकारी एस. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सहा वॉटर टँकर, तीन रेस्क्यू वाहन, पाण्याचे तीन मोठे टँकर आदींच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. सायंकाळी ६ पर्यंत ही आग धुमसत होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण आले तरी याठिकाणी उशिरापर्यंत ‘कुलिंग’चे काम सुरु होते. सकाळी कामगारांना कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आधीच या कंपनीत लॉकडाऊनमुळे अवघ्या १० ते २० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामासाठी प्रवेश दिला जातो. त्यात आगीची ही घटना घडल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आगीत कंपनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
* शाळा बंद असल्यामुळे धोका टळला
रोड क्रमांक एक हा वर्तकनगर, शिवाईनगरकडे जाणारा मोठा रहदारीचा रस्ता आहे. याच रस्त्याच्या आतील बाजूस काही अंतरावरच रेमंडचे आऊटलेट आणि कार्यालय देखिल आहे. काही अंतरावरच सुलोचना देवी सिंघानिया शाळा आहे. शाळा बंद असल्याने तसेच पहाटेची वेळ असल्यामुळे मोठी जिवित हानी टळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fire at Raymond Company office in Thane: Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.