डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्र दुर्लक्षित

By admin | Published: May 11, 2017 01:49 AM2017-05-11T01:49:05+5:302017-05-11T01:49:05+5:30

आधारवाडीतील अग्निशमन दलाच्या केंद्राच्या दुरवस्थेकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच, आता डोंबिवलीतील ‘ह’ प्रभागातील

Fire Service Center in Dombivli West ignored | डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्र दुर्लक्षित

डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्र दुर्लक्षित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आधारवाडीतील अग्निशमन दलाच्या केंद्राच्या दुरवस्थेकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच, आता डोंबिवलीतील ‘ह’ प्रभागातील अग्निशमन केंद्राचे नादुरुस्त प्रवेशद्वार दुरुस्त करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. नादुरुस्त प्रवेशद्वार अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी अडचणीचे ठरत आहे. ही वाहने आतबाहेर नेता येत नसून त्यात सुरक्षारक्षकांची दमछाक होत आहे.
आधारवाडी अग्निशमन दलाच्या कें द्राच्या दुरवस्थेचा मुद्दा वारंवार स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला आहे. परंतु, यावर ठोस कृती अद्यापही झालेली नाही. महापालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हे केंद्र धोकादायक असल्याचेही समोर आले आहे. मात्र, आजवर योग्य कार्यवाही झालेली नाही. याचप्रमाणे डोंबिवली पश्चिमेतील केंद्रही दुर्लक्षित झाले आहे. या अग्निशमन केंद्रासमोरील प्रवेशद्वार नादुरुस्त झाले आहे. ते उघडणे आणि बंद करणे जिकिरीचे झाले आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर या केंद्राची निर्मिती झाली. कार्यालयातील पार्किंगची जागा केंद्राला वापरण्यास देण्यात आली. परंतु, ती अपुरी पडत असल्याने कें द्रातील जवानांना आपत्कालीन प्रसंगासाठी आवश्यक असलेल्या साधनसाम्रगींची पेटारे बाहेरच ठेवावी लागत आहेत. त्यात समोरील प्रवेशद्वार बिघडल्याने हे सामान चोरीला जाण्याचीही शक्यता आहे.
‘ह’ प्रभाग कार्यालयातील बहुतांश प्रवेशद्वारे ही नादुरुस्त असल्याने प्रभाग अधिकारी शरद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारीही केल्या आहेत. मात्र, ते कोणतीच ठोस कार्यवाही करत नसल्याने सुरक्षा राखायची तरी कशी, असा प्रश्न येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना पडला आहे. या अग्निशमन केंद्रात सध्या दोन बंब आहेत. आपत्कालीन प्रसंग, घटनांचा कॉल आल्यावर नादुरुस्त प्रवेशद्वारामुळे बंब बाहेर काढताना जवानांची चांगलीच कसरत होत आहे.

Web Title: Fire Service Center in Dombivli West ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.