पार्किंगमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 09:59 AM2021-09-13T09:59:19+5:302021-09-13T10:00:30+5:30

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली.

Fire six vehicles in the parking lot; Burn three vehicles in thane | पार्किंगमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक

पार्किंगमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक

Next
ठळक मुद्देसिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली

ठाणे : येथील वसंत विहार येथे सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात उभ्या केलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत सहा वाहनांनी पेट घेतल्याची घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन वाहने जळून खाक झाली असून यामध्ये एक चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचा समावेश आहे.

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली. यामध्ये इतर पाच वाहनांनीही पेट घेतला. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवत असताना, तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून अन्य तीन गाड्यांचेही या आगीत नुकसान झाले आहे. 
 
दरम्यान, ही आग दोन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांना लागली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. तसेच या घटनेत कोणीतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
 

Web Title: Fire six vehicles in the parking lot; Burn three vehicles in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.