उल्हासनगरात फटाक्याने लागल्या आगी, लाखोचा ऐवज जळून खाक
By सदानंद नाईक | Published: November 15, 2023 05:19 PM2023-11-15T17:19:52+5:302023-11-15T17:20:38+5:30
घरातील लाखोंचा ऐवज आगीत जळून खाक.
उल्हासनगर : शहरात फटाक्याने आगी लागण्याच्या ३ घटना सोमवारी रात्री उघड होऊन आगीत लाखोंचा ऐवज खाक झाला. फटाक्यांची आतिषबाजी शहरात सुरू असून एमएमआरडीए क्षेत्रात शहर सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. उल्हासनगरात फटाक्याच्या मार्केट मध्ये फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे.
रात्री १० नंतर फटाके वाजविण्यास बंदी असतांना मध्यरात्रीचे ३ वाजे पर्यंत पटक्याची आतिषबाजी सुरू असूनही आतापर्यंत एकही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला नाही. कॅम्प नं-१, हेमराज डेअरी जवळील राधाकृष्ण इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी मध्यवर्ती आग लागून चंचलानी यांच्या घरातील लाखोंचा ऐवज आगीत खाक झाला.
अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणल्याने, पुढील अनर्थ टळला आहे. फटाके बाजारातील एका फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. अश्याच आगीच्या अन्य दोन घटना शहरातील विविध ठिकाणी घडल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली आहे.