पुन्हा उल्हासनगरात आगीची घटना! तीन मजली रोशन कार्ड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:50 PM2020-08-10T16:50:11+5:302020-08-10T16:50:59+5:30

अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी आग विझविली असून अनेक तास आग धुमसत होती.

Fire in Ulhasnagar again! Three-storey lighted card shop on fire, millions of goods destroyed | पुन्हा उल्हासनगरात आगीची घटना! तीन मजली रोशन कार्ड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक

पुन्हा उल्हासनगरात आगीची घटना! तीन मजली रोशन कार्ड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक

Next
ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं -३ शिवाजी चौक परिसरात प्रसिद्ध प्रेस बाजार असून रात्र - दिवस येथे लग्न पत्रिका व इतर प्रिंटिंग काम सुरू असते.

उल्हासनगर : शहरातील प्रसिध्द प्रेस बाजारातील तीन मजली रोशन कार्ड दुकानाला रविवारी रात्री ११ वाजता आग लागून आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी आग विझविली असून अनेक तास आग धुमसत होती.

 उल्हासनगर कॅम्प नं -३ शिवाजी चौक परिसरात प्रसिद्ध प्रेस बाजार असून रात्र - दिवस येथे लग्न पत्रिका व इतर प्रिंटिंग काम सुरू असते. रविवारी रात्रीचे ११ वाजण्याच्या दरम्यान तीन मजली रोशन कार्ड दुकानाच्या वरच्या मजल्यावरुंन धूर निघण्यास सुरवात झाली. स्थानिक नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलाला माहिती दिल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अरुंद रस्ता व दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाता येत नसल्याने आग विझविण्यात अडथळे आले. आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आगीचा फटका शेजारील दुकानाला बसला आहे.


नुकतेच कॅम्प नं-४ ओ टी सेक्शन येथील एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले होते. त्यामुळे उल्हासनगरात एकामागोमाग एक आगीच्या घटना घडत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

Web Title: Fire in Ulhasnagar again! Three-storey lighted card shop on fire, millions of goods destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.