मीरा भाईंदरमध्ये दिवाळीत दोन तास फटाके फोडण्यास परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 03:33 PM2020-11-13T15:33:44+5:302020-11-13T15:44:14+5:30

Mira Bhayandar News : मोठे आवाज आणि धूर पसरवणारे फटाके सार्वजनिक , खाजगी जागेत फोडू नयेत.  रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी ल असून अन्य वेळात फटाके फोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे . 

Firecrackers allowed for two hours on Diwali in Mira Bhayandar | मीरा भाईंदरमध्ये दिवाळीत दोन तास फटाके फोडण्यास परवानगी 

मीरा भाईंदरमध्ये दिवाळीत दोन तास फटाके फोडण्यास परवानगी 

Next

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गा मुळे सर्व धर्मियांनी धार्मिक स्थळे बंद ठेऊन आणि सण साधेपणाने घरीच साजरे करून आपली जबाबदारी पाळली आहे .  दिवाळी सह  छटपूजा,  ख्रिसमस , न्यू इयर आदी नागरिकांनी साधेपणाने साजरे करून फटाके फोडू नयेत असे आवाहन आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी केले आहे . मोठे आवाज आणि धूर पसरवणारे फटाके सार्वजनिक , खाजगी जागेत फोडू नयेत.  रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी ल असून अन्य वेळात फटाके फोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे . 

कोरोनाचा संसर्ग आता काही जाणवत असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही . त्यातच दिल्लीत पुन्हा झालेला कोरोनाचा उद्रेक आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आदी पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मधील नागरिकांनी देखील आपले कर्तव्य - जबाबदारी काटेकोरपणे पाळावी असे आवाहन महापालिके कडून करण्यात आले आहे . 

दिवाळीच्या अनुषंगाने आयुक्त डॉ . राठोड यांनी आदेश जरी केले असून दिवाळी मध्ये रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी राहणार आहे . छटपूजेला सकाळी ६ ते ८ आणि नाताळ व न्यू इयर ला रात्री ११. ते १२. ३० या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत . या व्यतिरिक्त अन्य वेळात फटाके फोडल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे . 

दिवाळी आदी सण देखील साजरे करताना गर्दी करू नये . वृद्ध , लहान मुलं , आजारी व्यक्तींनी बाहेर जाणे टाळावे . दिवाळी निमित्त गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये . ओनलाईन , फेसबुक लाईव्ह वर कार्यक्रम सादर करावेत . आरोग्य शिबीर, जनजागृती पर सामाजिक कार्यक्रम करावेत .

हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायीक आदी ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. फटाक्यांचा धूर घातक असल्याने कोरोना वा अन्य रुग्णांच्या जीवाला धोका होत असल्याचे आयुक्त डॉ राठोड यांनी म्हटले आहे. 

Web Title: Firecrackers allowed for two hours on Diwali in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.