ग्लोबल कोविड सेंटरची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:55+5:302021-05-11T04:42:55+5:30

ठाणे : कौसा येथील प्राइम रुग्णालयाला आग लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील ...

Firefighting at the Global Covid Center | ग्लोबल कोविड सेंटरची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

ग्लोबल कोविड सेंटरची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

Next

ठाणे : कौसा येथील प्राइम रुग्णालयाला आग लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते ठाणे पालिकेच्या प्रशासनाने जुमानले नसल्याचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी सोमवारी उघडकीस आणले. ठामपाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ग्लोबल कोविड सेंटरमधील अग्निसुरक्षा बेभरवशाची असल्याचे आणि त्या ठिकाणी उभारलेली अग्निसुरक्षा यंत्रणेची हाताळणी करण्याचे प्रशिक्षणच अग्निशमन दलाच्या जवानांना दिलेले नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनीच पठाण यांना सांगितले. यामुळे डमी अग्निसुरक्षा यंत्रणा उभी करून प्रशासनाने धूळफेक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

ग्लोबल कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची खातरजमा करण्यासाठी पठाण यांनी ज्येष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, विक्रम खामकर यांच्यासह ग्लोबल रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीमध्ये जे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. ते स्वीकारले जात नसल्याचे निदर्शनास आले, तर येथील अग्निसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याचेही आपल्या निदर्शनास आले असल्याचे पठाण यांनी सांगितले.

या ठिकाणी तैनात केलेले फायरमॅन सदरची यंत्रणा मानवचलित असल्याचे सांगत आहेत. ती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आलेले नाही. या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे असतानाही असा अधिकारीही या ठिकाणी तैनात नाही. विशेष म्हणजे, आग विझवण्यासाठी अवघ्या ५०० लिटर पाण्याचा एक टँकर उभा केलेला आहे. ही सर्व सामग्री ‘मॉक ड्रिल’ प्रमाणे असून डमी यंत्रणा उभारून पालिका प्रशासनाने फसवणूक केली आहे. जी परिस्थिती ग्लोबलची आहे; तीच परिस्थिती कौसा आणि पार्किंग प्लाझा येथीलही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या दौऱ्यात समीर नेटके, दिनेश बने, दिनेश सोनकांबळे, फिरोज पठाण, दिलीप उपाध्याय आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Firefighting at the Global Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.