रसायनांच्या गोदामास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:34 AM2017-07-20T02:34:01+5:302017-07-20T02:34:01+5:30

ग्रामीण भागातील रसायनांच्या गोदामास आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी दुपारी भिवंडी-वसई मार्गावरील वडूनवघर येथील शक्ती इंडस्ट्रीयल पार्कमधील

Firewood of chemicals | रसायनांच्या गोदामास आग

रसायनांच्या गोदामास आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : ग्रामीण भागातील रसायनांच्या गोदामास आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी दुपारी भिवंडी-वसई मार्गावरील वडूनवघर येथील शक्ती इंडस्ट्रीयल पार्कमधील रसायनांच्या गोदामाला आग लागून त्यात तीन कामगार जखमी झाले.
कमलेश विश्वकर्मा, मिथिलेश व संजय मोजे अशी जखमी कामगारांची नावे असून त्यांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी संजय हा जास्त भाजल्याने त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे नेण्यात आले. ही आग वडूनवघर गावातील शक्ती इंडस्ट्रीयल पार्कमधील ए-७, गाळा क्र. ५ या गोदामात साठवलेल्या रसायनांना लागली. हा गाळा जीवाभाई अंदोरिया मोर यांच्याकडून महेंद्रभाई व देवांगभाई यांनी भाड्याने घेतला आहे. त्यांनी बेकायदा रसायन साठवले होते. सायंकाळी ६ वाजता आग नियंत्रणात आली. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही. पाच दिवसांपूर्वी ठाणे मार्गावरील पूर्णा येथे गोदामास आग लागली होती.

Web Title: Firewood of chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.