भाजपा महिला अध्यक्षांच्या नातेवाईकाकडून मिरवणुकीत नाचताना हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 08:42 PM2017-10-04T20:42:00+5:302017-10-04T20:44:14+5:30

अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या नातेवाईकाने देवीच्या विसर्जन मिरवणूकीत नाचतांना हवेत दोन वेळा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. स्वत: सुजाता भाईर यांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे.

 Firing of air in a procession by a relative of BJP president of BJP | भाजपा महिला अध्यक्षांच्या नातेवाईकाकडून मिरवणुकीत नाचताना हवेत गोळीबार

भाजपा महिला अध्यक्षांच्या नातेवाईकाकडून मिरवणुकीत नाचताना हवेत गोळीबार

Next

अंबरनाथ - अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या नातेवाईकाने देवीच्या विसर्जन मिरवणूकीत नाचतांना हवेत दोन वेळा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. स्वत: सुजाता भाईर यांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. गोळीबार करणारा व्यक्ती हा भोईर यांच्या जवळचा नातेवाईक असुन त्यांच्या समोरच हा गोळीबार करण्यात आला आहे. 

अंबरनाथ भाजपा शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर आणि त्यांचे नातेवाईक एका मिरवणूकत नाचतांनाचा व्हिडीओ फेसबुकवर वायरल झाला आहे. हा व्हिडीओ 1 ऑक्टोंबरचा असुन सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणूकीत नाचतांना हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. नाचतांना हवेत फायरिंग करतांनाचा व्हिडीओ भोईर यांनी आपल्याच कार्यकत्र्याना काढण्यास सांगितले होते. येवढेच नव्हे तर हा व्हिडीओ लागलीच फेसबुकवर लोड देखील करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये दिसणारा तरुण हा आशिष भोईर नामक व्यक्ती असुन तो सुजाता भोईर यांना जवळचाच नातेवाईक आहे. हा सर्व प्रकार सुजाता भोईर यांच्या समोर घडलेला असतांनाही तो प्रकार रोखण्याचा कोणताच प्रयत्न  त्यांच्या मार्फत झालेला नाही. उलय या फायरिंगचा आनंद घेत जास्त जोमात नाचण्याचेच काम येथे करण्यात आले. 

चार महिन्यांपूर्वीच अंबरनाथच्या गायकवाड पाडा येथे नाचतांना तरुणांनी चालविलेल्या बंदुकीतुन सुटलेली गोळी समोर बसलेल्या एका 13 वर्षीय मुलाला लागुन त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका बडय़ा राजकीय पुढा-याच्या दोन्ही मुलांना देखील अटक झाली होती. असे असतांना देखील देवीच्या मिरवणूकीत भर गर्दीत पुन्हा गोळीबार घडल्याने पोलीसांचा धाक राहिलेला नाही हे उघड झाले आहे. 

या संदर्भात पोलीसांकडुन माहिती घेतली असता आशिष भोईर यांना बंदुकीचा परवाना देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या बंदुकीतुन ही फायरिंग झाली आहे ती बंदुक परवानाधारक असल्याचे समोर येत आहे. मात्र परवानाधारक बंदुकीतुन हवेत गोळीबार करण्याचा किंवा सण,उत्सव किंवा लगअसमारंभात फायरिंग करणो हा गुन्हा आहे. हा गुन्हा घडत असलेला व्हिडीओ भाजपा महिला अध्यक्ष स्वत:च्या फेसबुक अकाऊंटमध्ये लोड करित असल्याने भाजपा महिला अध्यक्षा अडचणीय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या संदर्भात महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बोलण्यास टाळले. 


 ह्याया व्हिडीओ पाहुन संबंधीत गोळीबार करणा-या व्यक्तीवरची चौकशी केली जाईल. त्याच्याकडील लायसन्स याची देखील तपासणी करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणो हे बेकायदेशिर असुन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

- अंकित गोयल, पोलीस उपायुक्त

Web Title:  Firing of air in a procession by a relative of BJP president of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.