किमया बवुआ ठाण्यातील सिंघानिया शाळेत प्रथम, ९९.८ टक्क्यांनी उत्तीर्ण
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 6, 2024 21:29 IST2024-05-06T21:29:28+5:302024-05-06T21:29:39+5:30
किमयाच्या यशाचा आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केल्या आहेत.

किमया बवुआ ठाण्यातील सिंघानिया शाळेत प्रथम, ९९.८ टक्क्यांनी उत्तीर्ण
ठाणे : आयसीएसई बोर्डाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतून किमया बवुआ ही ९९.८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. किमयाच्या यशाचा आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केल्या आहेत.
किमया ही तीन हात नाका येथे राहत असून तीचे शालेय शिक्षण श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेत पूर्ण झाले. तिने दहावीच्या परिक्षेत हे सुवर्ण यश मिळवलेले आहे. किमयाने आपल्या या यशाचे श्रेय शिक्षक आणि पालकांना दिले आहे. ती म्हणाली गणित हा माझा आवडता विषय असून त्यात मी सर्वांत चांगले गुण प्राप्त केले आहे. पुढे सांगितले की, मी दररोज अभ्यास करीत होते. शाळेत जे शिकवायचे त्याचा सराव घरी येऊन करत. पहिल्यापासून मी लिखाणाचा सराव चालू ठेवला आणि त्याची मदत मला परिक्षेत झाली. अकरावीला मी विज्ञान ही शाखा निवडणार आहे. विज्ञान हा माझा आवडता विषय असल्याने त्याच क्षेत्रात पुढील करिअर करेल अशी इच्छा तिने व्यक्त केली. मला अपेक्षा असली तरी निकाल पाहून सुखद धक्का बसला. स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटले.
.किमयाची आई गृहिणी तर वडील उद्योजक आहेत. तिला तिच्या अभ्यासात आईने मोलाचे सहकार्य केल्याचे तिने सांगितले.