ठाण्यात प्रथमच अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया; केबीपी महाविद्यालयात सोमवारी उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 02:36 PM2021-08-28T14:36:50+5:302021-08-28T14:37:06+5:30
४४ फुटी वॉलवर उलगडणार अकाउंटन्सीचा प्रवास.
ठाणे : ठाण्यात प्रथमच "अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया" उभारले जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. केबीपी महाविद्यालयात उद्घआटन होणार आहे अशी माहिती आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी दिली.
ठाण्यात प्रथमच ४४ फुटांची वॉल ऑफ अकाउंटन्सी तयार करण्यात आली आहे. या भिंतीवर अकाउंटनसीचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए निहार जंबूसारिया यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या वॉलचे उद्घाटन होणार आहे, तर आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सिलचे चेअरमन मनीष गाडीया हे प्रत्यक्षात ही या म्युझियमच्या उद्घाटनासाठी ठाण्यात येत आहेत. त्याचबरोबर व्हाईस चेअरमन दृष्टी देसाई, सेक्रेटरी अर्पित काबरा, खजिनदार जयेश काला, कार्यक्रमाचे समन्वयक सीए योगेश प्रसादे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. संतोष गावडे उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांपर्यंत अकाउंटंसीचा इतिहास पोहचविणे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीए हा व्यवसाय निवडून स्वत:चा व्यावसायिक उत्कर्ष साधावा हा यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे.