बोईसरला साकारले राज्यातील पहिले अक्षयपात्र

By Admin | Published: December 24, 2015 01:32 AM2015-12-24T01:32:51+5:302015-12-24T01:32:51+5:30

शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नियमीत सकस व पुरेसा आहार मिळण्याकरीता महाराष्ट्र शासनाने प्रायोगीक तत्वावर नाशिक व पालघर जिल्ह्यात टाटा ट्रस्ट व अक्षय

First Akshaypatra in the state of Boisar | बोईसरला साकारले राज्यातील पहिले अक्षयपात्र

बोईसरला साकारले राज्यातील पहिले अक्षयपात्र

googlenewsNext

पंकज राऊत, बोईसर
शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नियमीत सकस व पुरेसा आहार मिळण्याकरीता महाराष्ट्र शासनाने प्रायोगीक तत्वावर नाशिक व पालघर जिल्ह्यात टाटा ट्रस्ट व अक्षय पात्र फाऊंडेशनच्या सहकार्याने मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू केले असून त्याची रचना, कार्यपद्धत व व्यवस्थापन आरोग्यदायी रितीने केले आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेकडील बेटेगाव येथील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या आवारात एका वेळी सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविण्याची क्षमता असलेले अद्यावत मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आले असून पालघर व डहाणू तालुकयातील एकूण अठरा आदिवासी आश्रमशाळांतील सुमारे ८९०० विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, त्यानंतर अल्पोपहार व रात्रीचे जेवण पुरविण्यात येणार आहे.
या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात कंन्टयुन्युशेन प्रोसेसने चालणारे चाळीस हजार लीटर क्षमतेच्या दोन पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा (आर.ओ) असून स्वयंपाकासाठी त्यातील शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. काही कारणास्तव या यंत्रणेमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यास स्टँड बाय प्रोसेस ही ठेवण्यात आली आहे. नाश्ता व जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल हा ब्रँडेड व चांगल्या दर्जाचा असून तो औरंगाबादच्या वॉलमॉर्कमधून येणार आहे. भाजीपाला नाशिकहून थेट आणून तो कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात येत आहे.
भाजीपाला स्वच्छ धुतल्यानंतर तो मशीनवर चिरला जातो. अक्षयपात्रा फाऊंडेशनच्या टेक्नीकल अ‍ॅडव्हाईज व मार्गदर्शनानुसार संपूर्ण नाश्ता व जेवण आरोग्यदृष्ट्या परीपूर्ण काळजी व तत्परता घेउन बनविण्यात येणार असून इडली व डोसा तसेच शाकाहारी व मांसाहारी जेवण तयार करण्याकरीता वेगवेगळ्या किचनची उभारणी करण्यात आली आहे. तांदूळ धुण्यासाठी व मसाल्याचे योग्य पद्धतीने मिश्रण तयार करण्यासाठीही स्वतंत्र मशिन आहे.
प्रत्येकी १२० किलो क्षमतेचे तीन स्टेनलेसस्टीलचे कुकर असून त्यात तांदुळ तर अनय तीन स्टेनलीसस्टीलचे कुकर मध्ये अवघ्या अर्ध्या तासात डाळ शिजणार आहे. सर्व अन्न डिझेलच्या बॉयलरद्वारे वाफ तयार करून ती किचनला सप्लाय करण्यात येणार आहे. वाफेवर शिजवल्यामुळे अन्नातील पोषक द्रव्ये नष्ट पावणार नसून मुलांना परीपूर्ण व सकस अन्नघटक त्यातून मिळतील. पाइपमधून वाफ लिग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

Web Title: First Akshaypatra in the state of Boisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.