देशातील पहिला ब्राउनफिल्ड प्रकल्प, हक्काच्या घराचे स्वप्न क्लस्टरमुळे होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:30 AM2018-03-15T03:30:20+5:302018-03-15T03:30:20+5:30

धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग क्लस्टरमुळे अखेरीस खुला झाला

The first brownfield project in the country, will be completed due to the dream cluster of the house of the claim | देशातील पहिला ब्राउनफिल्ड प्रकल्प, हक्काच्या घराचे स्वप्न क्लस्टरमुळे होणार पूर्ण

देशातील पहिला ब्राउनफिल्ड प्रकल्प, हक्काच्या घराचे स्वप्न क्लस्टरमुळे होणार पूर्ण

googlenewsNext

ठाणे : धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग क्लस्टरमुळे अखेरीस खुला झाला असून या योजनेमुळे ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार असून देशातील पुनर्विकासाचा हा सर्वात मोठा ब्राउनफिल्ड प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण बुधवारी त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. धोकादायक इमारती कोसळून निष्पाप जीवांचे नाहक बळी जाण्याचे प्रकार ठाण्यात वारंवार घडत होते. लक्षावधी नागरिक जीव मुठीत धरून या इमारतींमध्ये राहतात. त्यांना हक्काचे सुरक्षित घर मिळावे, यासाठी मागील १४ वर्षे लढा सुरू होता. विधिमंडळातदेखील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा वारंवार उपस्थित करून ठाण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्याची मागणी केली होती.
विधिमंडळाचे कामकाज अनेकदा बंद पाडले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायºयांवर घेराव घातला. प्रसंगी निलंबनही पत्करले. ठाणे ते विधिमंडळ असा ठाणेकरांचा भव्य मोर्चा काढला, ज्यात स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.
या प्रदीर्घ लढ्यानंतर २०१४ साली विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर केली. परंतु, त्या योजनेत अनेक त्रुटी होत्या. त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या माध्यमातून सोशल इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सादर केला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर, न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने ठाण्यासाठी सुधारित क्लस्टर योजनेची अधिसूचना जारी केली.
त्यानुसार, ठाण्यासाठी तिचा आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टर योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील आणि ठाण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडेल, असेही ते म्हणाले.

>तलावही घेणार मोकळा श्वास
देशातील पुनर्विकासाचा हा सर्वात मोठा ब्राउनफिल्ड प्रकल्प असणार आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
क्लस्टरमुळे शहरातील ग्रीन झोन्स, अ‍ॅमिनिटीत वाढ होणार असून वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्तेदेखील उपलब्ध होणार आहेत. तसेच, अतिक्र मणे झालेल्या तलावांनाही मोकळा श्वास घेता येणार आहे. कारण, त्यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: The first brownfield project in the country, will be completed due to the dream cluster of the house of the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.