दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:52 PM2020-04-11T19:52:22+5:302020-04-11T19:53:04+5:30

कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता अखेर दिवा भागतही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्या कॉन्टेक मध्ये आणखी कोण कोण आले आहे, याचा तपास आता सुरु झाला आहे. दुसरीकडे ठाण्यातील ढोकाळी भागातही आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंब्रा आणि कळव्यात प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानुसार आता शहरात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हा ४३ वर पोहचला आहे.

The first coronary patient found in the light Another medical officer received coronary infection, the number of coronary obstruction patients. | दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३

दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३

googlenewsNext

ठाणे : ठाणे शहराच्या जवळ जवळ सर्वच भागात सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्याचे दिसत आहे. कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता दाट लोकवस्तीच्या असलेल्या दिव्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. याठिकाणी कुठे चाळी तर कुठे इमारती या दाटीवटीने उभ्या आहेत. त्यामुळे आता येथे खबरदारीचे उपाय करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. तर ठाण्यातील ढोकाळी भागात मुलासह त्याच्या वडीलांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून एका वैद्यकीय सेवा देणाºयाच्या संपर्कात आल्याने त्यांनाही लागण झाल्याची माहिती पालिकेने दिली. विशेष म्हणजे यातील एक जण वैद्यकीय सेवा देणारा अधिकारी असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाण्यात वैद्यकीय सेवा देणाºया कोरोना बाधीतांची संख्या वाढतांना दिसत आहे. तर कळवा, खारेगाव भागात आणि मुंब्य्रातही एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.
                  कोरोना बाधीतांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांची संख्याही वाढतांना दिसत आहे. आता पर्यंत शहरातील वैद्यकीय सेवा पुरविणाºया पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील ढोकाळी भागात वास्तव्यास असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या वडील आणि त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा वैद्यकीय सेवा देणारा रुग्ण सुरवातीला शहरात सापडलेल्या एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यालाही याची लागण झाल्याची माहिती पालिकेने दिली.
दुसरीकडे आता कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता दिव्यातही कोरोनाने दस्तक दिली आहे. दिव्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. दिवा हा भाग दाट लोकवस्ती भाग म्हणून ओळखला जातो. चाळींची संख्या देखील येथे जास्त आहेत, इमारती देखील दाटीवटीने वसल्या आहेत. येथे जवळ जवळ पाच लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे आता पहिला रुग्ण सापडल्याने येथील पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी पालिकेने चोख पावले उचलण्यास सुरवात केली आहे. दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनीत हा रुग्ण आढळला आहे. सदर रुग्ण हा उल्हासनगर भागात वास्तव्यास होता, त्यानंतर तो दिव्यात आला होता. परंतु त्याला होम क्वॉरन्टाइन करुन ठेवण्यात आले होते. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आला आहे. परंतु या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, त्याच्या संपर्कात अन्य कोण कोण आले आहेत, किंवा कोणामुळे त्याला याची लागण झाली याचा तपास आता सुरु झाला आहे. दरम्यान आता तो ज्या हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी गेला होता. ते दिव्यातील हॉस्पीटल क्वॉरन्टाइन करण्यात आले असून मुंब्रा देवी कॉलनीचा अर्धा भागही सील करण्यात आला आहे. तर त्याच्या घरातील अन्य चार जणांचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दुसरीकडे मुंब्रा अमृत नगर भागातही एक रुग्ण वाढला असून या भागातील ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. त्याच्या घरातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर कळवा, खारेगाव भागातही कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.

Web Title: The first coronary patient found in the light Another medical officer received coronary infection, the number of coronary obstruction patients.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.