शाळेच्या पहिल्या दिवशी ठाणे जि.प. उपाध्यक्षांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; सुरक्षेची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:48 PM2021-10-04T17:48:08+5:302021-10-04T18:21:49+5:30
जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच 27 जानेवारीला शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, रु ग्णसंख्या वाढू लागताच परीक्षेपूर्वीच 15 मार्चपासून शाळा बंद केल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : गेल्या दीडनंतर जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या तब्बल 4क्क् शाळा जिल्ह्याभरात सोमवारी सुरू झाल्या. या शाळेच्या पहिल्या दिवशी हजर होणा:या विद्याथ्र्याचे ठाणो जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती सुभाष पवार, यांनी शाळेच्या वेळेत जाऊन भिवंडीच्या दिवे अंजूर व माणकोली येथील शाळेच्या विद्यांना पुष्प गुच्छ देत त्यांचे स्वागत केले. याशिवाय त्यांच्या पालकांना विद्याथ्र्याच्या सुरक्षेची ग्वाही दिली.
या विद्यार्थी शाळेत हजर होताच शिक्षकांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला. एवढेच नव्हे तर प्रथमच या विद्याथ्र्यांनी ऑनलाईन वर्गाऐवजी थेट वर्गातच गमभनची अक्षरे पाटीवर गिरवत वर्गातील अभ्यासाचा o्रीगणोशा या विद्याथ्र्यानी शिक्षण सभापतींच्या साक्षीने सोमवारी केला. या विद्याथ्र्याना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांशीही पवार यांनी सुसंवाद साधला आणि मुलांच्या सुरक्षिततेची हमी दिली. राज्य सरकारच्या आदेशाने ठाणो जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळांची साफसपाई व्यवस्थीत झाली की नाही, सॅनिटायक्षरची उपलब्धता आदींची पाहणीही पवार यांनी करून पालकांना सुरक्षेची खात्री पटवून दिली.
जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच 27 जानेवारीला शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, रु ग्णसंख्या वाढू लागताच परीक्षेपूर्वीच 15 मार्चपासून शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील 400 शाळा विद्यार्थी गजबजल्या. या विद्याथ्र्याच्या आरोग्यासह त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांना आवश्यक ती सतर्कता बाळगण्याचे मार्गदर्शनही पवार यांनी या भेटी दरम्यान शिक्षकांना दिले. एखादी अडचण वा विद्यार्थी आजारी असल्याचे आढळताच तत्काळ शिक्षण विभागाच्या अधिका:यांना कळविण्याचे सुचनाही ही पवार यांनी यावेळी दिल्या. या शाळांच्या भेटीं दरम्यान पवार यांच्या सोबत जि.प.चे माजी सभापती कुंदन पाटील, सदस्य देवेश पाटील, सरपंच आरती पाटील, अरविंद माळी, आकाश म्हात्रे, शिक्षण विभागाचे संतोष कदम आदी उपस्थित होते.