खाजगी डॉक्टराचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न; प्रसूती, शस्त्रक्रिया, तपासणी व विमा मिळणार अल्प दरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 03:36 PM2018-02-04T15:36:37+5:302018-02-04T15:36:50+5:30
डॉक्टरी पेशाला आजकाल नावे ठेवली जात असताना सामाजिक बांधिकलीच्या जाणीवेतून अल्प दरात नैसर्गिक प्रसूती व शस्त्रक्रिया करणारी उमाई जननी आरोग्य कवच योजना राबविण्याचा मानस कल्याणमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. साईनाथ बैरागी यानी केला आहे
कल्याण - डॉक्टरी पेशाला आजकाल नावे ठेवली जात असताना सामाजिक बांधिकलीच्या जाणीवेतून अल्प दरात नैसर्गिक प्रसूती व शस्त्रक्रिया करणारी उमाई जननी आरोग्य कवच योजना राबविण्याचा मानस कल्याणमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. साईनाथ बैरागी यानी केला आहे. केवळ आरोग्य कवच योजनाच नाही तर महिलेच्या कुटुंबियांनासुद्धा 1 लाखाचा अपघाती विमा मोफत काढून दिला जाणार आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा येत्या 13 फेब्रुवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. खाजगी डॉक्टरने अशा प्रकारे गरोदर मातांसाठी केलेली महाराष्ट्रातील ही पहिलीच योजना असून बेटी बचावसाठी प्रयत्नशील असलेल्या डॉक्टरांनी आधी माता वाचली तर बेटी वाचेल याला प्रथम प्राधान्य दिले आहे.
उमा देवी बैरागी रुग्णालय व रिसर्च सेंटर डॉ. बैरागी गेल्या दहा वर्षापासून चालवित आहे. दहा वर्षाच्या वर्ष पूर्ती निमित्त ही योजना सुरु करण्यात येणार आहे. तत्पूर्वी समाजिक कार्यासाठी त्यांनी उमाई फाऊंडेशनची स्थापना 2014 मध्ये केली आहे. त्या माध्यमातून ते समाजिक कार्य करीत आहेत. त्यांच्या आई उमा देवी यांची मुलगी बाळंतपणात मृत्युमुखी पडली. त्यानंतर उमादेवी यांनी डॉ. साईनाथ यांना स्त्रीरोग तज्ज्ञ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. डॉक्टर होऊन कोणत्याही आईवर तिचे बाळ दगाविण्याची वेळ येऊ नये असे सांगितले. आईच्या नावानेच योजना सुरु करण्यात येणार आहे.
डॉ. बैरागी यांनी सांगितले की, प्रसूतीच्या वेळी शस्त्रक्रियेसाठी 40 ते 45 हजार खर्च येतो. तसेच नैसर्गिक प्रसूतीसाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. अनेक महिलांना हा खर्च ङोपणारा नसतो. उमाई जननी आरोग्य कवच योजने अंतर्गत नैसर्गिक प्रसूतीसाठी केवळ 3 हजार 500 रुपये आकारले जातील. तसेच शस्त्रक्रियेसाठी केवळ बारा हजार रुपये आकारले जातील. त्यासाठी गरोदर मातेला नाव नोंदणी करणो आवश्यक आहे. याशिवाय रक्त, ह्रदय, स्तूलपणा, ईसीजी, रक्तातले ऑक्सीजन, साखर, हाडातील ठिसूळपणा आणि वजन याचीही तपासणी केली जाईल. या चाचण्यासाठी बाहेर 2 हजार 500 रुपये खर्च येतो. डॉक्टरांच्या योजनेत केवळ 2क्क् रुपये आकारले जाणार आहेत. याच 200 रुपयात गरोदर मातेच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा एक वर्षाकरीता एक लाखाचा विमा देण्यात येणार आहे. ही योजना 13 फेब्रुवारी रोजी खासदार शिंदे यांच्या हस्ते लोर्कापण केली जाणार आहे. हा सोहळा स्प्रींग टाईम क्लब या ठिकाणी सायंकाली पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी खासदार कपील पाटील, आमदार नरेंद्र पवार, किसन कथोरे, गणपत गायकवाड, पांडूरंग बरोरा, अखिल भारतीय बैरागी परिषदेचे अध्यक्ष आर. के. वैष्णव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.