डोंबिवली पश्चिमेला महिलांसाठी प्रथमच स्वतंत्र ई-टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:55 PM2018-07-18T15:55:33+5:302018-07-18T15:58:50+5:30
येथिल रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते. ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पश्चिमेकडील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केवळ महिलांसाठी प्रथमच ई-टॉयलेटची सुविधा सुरू केली. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचे लोकार्पण करण्यात आले.
डोंबिवली: येथिल रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते. ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पश्चिमेकडील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केवळ महिलांसाठी प्रथमच ई-टॉयलेटची सुविधा सुरू केली.
बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्या स्वच्छतागृहामध्ये नवजात शिशूंना स्तनपान करण्यासाठी जागा आहे. तसेच चेजिंग रूमची सोय आहे. यासह ३ शौचालय असल्याची माहिती धात्रक यांनी दिली. तसेच तेथे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनची सुविधा देखिल तेथे आहे. ५ रूपयामध्ये या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे धात्रक म्हणाल्या. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मधल्या व कल्याण दिशेकडील पादचारी पूलानजीक ही सुविधा असून महिलांना सोयीचे होऊ शकेल अशी त्याची रचना आहे.रेल्वे स्थानकात अशी सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. स्थानकाच्या कल्याणसह मुंबई दिशेकडील प्रवेशद्वारांलगत स्वच्छतागृहाची सुविधा आहे, परंतू अशा प्रकारे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आणि त्यात स्तनपान करण्यासह चेजिंग रूम, शौचालय आणि सॅनीटरी नॅपकीनची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहे. शहरात एकमेव ठिकाणी ही सुविधा असल्याचे नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आवर्जून सांगितले. यासंदर्भात अनेकांनी सूचना दिल्या होत्या, त्यानूसार सर्वसमावेशक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील होतो, या टॉयलेटच्या माध्यमातून त्याची काही अंशी पूर्तता झाल्याचा विश्वास नमिता किर, बबिता बोस, विजय कुलकर्णी, स्वप्नील पाटील, विजय बावीस्कर, केतन सिंघानिया, ज्ञानेश्वर पगारे आदींनी व्यक्त केला. नागरिकांनी स्वच्छता पाळावी, तसेच या सुविधेचा चांगला वापर करावा असे आवाहन धात्रक दाम्पत्याने केले.