ठाणे जिल्ह्यातील बारावीच्या ९२९४४ विद्यार्थ्यांचा उद्या पहिला इंग्रजीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 05:26 PM2018-02-20T17:26:14+5:302018-02-20T17:30:47+5:30

कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

 The first English paper of 9,294 students of SSC in Thane | ठाणे जिल्ह्यातील बारावीच्या ९२९४४ विद्यार्थ्यांचा उद्या पहिला इंग्रजीचा पेपर

ठाणे जिल्ह्यातील बारावीच्या ९२९४४ विद्यार्थ्यांचा उद्या पहिला इंग्रजीचा पेपर

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षाचार भरारी पथक तैनात करण्यात आले कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर

ठाणे : बारावीच्या बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.
यंदा २० मार्चपर्यंत चालणा-या या परीक्षेसाठी विज्ञान शाखेचे ३२ हजार ४८ विद्यार्थी आहेत. याशिवाय कला शाखेचे १५ हजार ३४२, वाणिज्य शाखेचे ४४५४१ आणि एमसीव्हीसीचे एक हजार १३ आदी जिल्ह्याभरातील ९२ हजार ९४४ विद्यार्थी बारावीची ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ कस्टडी सेंटर आहेत. १५८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चोक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी चार भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. ठिकठिकाणच्या केंद्रावर व्हीडीओ चित्रिकरणासाठी देखील खास पथक तैनात आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, निरंतन शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांचे चार भरारी पथक जिल्ह्याभरात तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर चोक पोलिस बंदोबस्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

Web Title:  The first English paper of 9,294 students of SSC in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.