ठाण्यामध्ये पुस्तक प्रेमींसाठी पहिल्यांदाच 'लॉक द बॉक्स' पुस्तक मेळावा

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 5, 2023 04:13 PM2023-10-05T16:13:08+5:302023-10-05T16:13:23+5:30

पुस्तक मेळ्यामधे एक दशलक्षाहून अधिक पुस्तके उपलब्ध

First ever 'Lock the Box' book fair for book lovers in Thane | ठाण्यामध्ये पुस्तक प्रेमींसाठी पहिल्यांदाच 'लॉक द बॉक्स' पुस्तक मेळावा

ठाण्यामध्ये पुस्तक प्रेमींसाठी पहिल्यांदाच 'लॉक द बॉक्स' पुस्तक मेळावा

googlenewsNext

ठाणे - ठाण्यामध्ये पुस्तक प्रेमींसाठी पहिल्यांदाच 'लॉक द बॉक्स' पुस्तक मेळावा आयोजित केला आहे. वाचनाच्या संवर्धनासाठी केलेल्या नव्या प्रयत्नाचा हा पुस्तक मेळावा आहे, त्याचा हा आधुनिक प्रयत्न म्हणजे हा मेळावा आहे. यात एक दशलक्षाहून अधिक पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. 

कोरम मॉलमध्ये या मोठ्या प्रमाणात पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. इथे दहा लाख पुस्तकातून ग्राहक आपल्या आवडीची पुस्तके निवडू शकतात. येथे नवी जुन्या पुस्तकांचा मेळ पाहायला मिळत आहे. पुस्तके इंग्रजी, हिंदी आणि मराठी, भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या संग्रहामध्ये क्राईम थ्रिलर, फिक्शन, प्रवास वर्णने, अनोखी वृत्तग्रंथ, विज्ञान आणि सामान्य ज्ञान, इत्यादीसारख्या विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे. या संग्रहात वेगवेगळ्या भाषेतील प्रमुख लेखकांची पुस्तके आहेत, ग्राहकांना आवडणाऱ्या पुस्तकाची निवड करू शकतात. ग्राहक निवडीसाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे कारण हा एक खुला मंच आहे. पुस्तक मेळा सुरुवातीला एक दशलक्ष पुस्तकांच्या संग्रहाने सुरू झाला. तथापि, मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, वेळोवेळी नवीन पुस्तके उपलब्ध केली जात आहेत. प्रत्येक भाषेतील संग्रह, शीर्षक आणि लेखकाचा मागोवा घेण्यासाठी संग्रह प्रचंड आहे. 

पुस्तक प्रदर्शनात 'लॉक द बॉक्स' संकल्पना राबविली आहे ज्यामध्ये, तीन बॉक्स त्यांच्या आकारानुसार आहेत जे तुम्हाला हव्या असलेल्या पुस्तकांच्या संख्येनुसार निवडू शकता. तुम्हाला हवे ते पुस्तक तुम्ही प्रचंड संग्रहातून गोळा करू शकता आणि ते भरेपर्यंत बॉक्समध्ये ठेवू शकता. एकदा का बॉक्स भरला आणि आणखी जागा शिल्लक राहिली नाही तर तुम्ही बॉक्स लॉक करू शकता. 'लॉक द बॉक्स' ही संकल्पना अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि ती सर्व पुस्तकप्रेमींना आवडत आहे. बॉक्स कधी पुस्तकांनी भरतो यावर 'लॉक द बॉक्स' ही संकल्पना अवलंबून असते.

Web Title: First ever 'Lock the Box' book fair for book lovers in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.