राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे दिमाखदार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 03:39 PM2019-06-09T15:39:36+5:302019-06-09T15:50:18+5:30

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

The first 'Maharashtra craft' in the state | राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे दिमाखदार अनावरण

राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे दिमाखदार अनावरण

Next
ठळक मुद्देमुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे.पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प याच ठिकाणी चितारण्यात आले आहे.

ठाणे - मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा या शिल्पाच्या माध्यमातून साकारली असल्याने त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प याच ठिकाणी चितारण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र माझा’ असे नाव असलेल्या चित्रशिल्पामध्ये जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, जोतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर  यांचे भित्तीचित्र शिल्प चितारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या भित्तीचित्रशिल्पाची निर्मिती प्रथमच मुंब्रा रेतीबंदर येथे करण्यात आलेली आहे. चित्रशिल्पकार केदार घाटे यांनी या चित्रशिल्पाची निर्मिती केली आहे. रविवारी (9 जून) चित्रशिल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. 

चित्रशिल्पाच्या अनावरणानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी 'हे चित्रशिल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचा संदेश प्रसारीत करणारे आहे. आभूषणे आणि शस्त्रांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांकडून स्वराज्य चालविण्याचे धडे घेत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी जे राज्य स्थापन केले ते भोसल्यांचे नव्हते. तर ते स्वराज्य होते. 18 पगड जातींना सामावून घेऊन समता आणि समानतेचे राज्य त्यांनी स्थापन केले होते. महात्मा फुलेंनी त्याच शिवाजी महाराजांची समाधी शोधून समतेच्या विचारांचा प्रचार केला होता' असं म्हटलं  आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी शिवराय-फुलेंच्या समानतेच्या विचारांचा विद्रोह जागवला होता. हे या चित्रशिल्पांच्या माध्यमातून आव्हाड यांनी दाखविले असतानाच या शिल्पात दोन स्त्रियांना वरचे स्थान दिले आहे. या दोन स्त्रिया म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले.  आज आपण स्त्रीच्या सबलीकरणाबाबत बोलत आहोत. पण, महिलांच्या सबलीकरणाचा आदर्श साडेतीनशे वर्षांपूर्वी मा जिजाऊंनीच दिला आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा महायज्ञ पेटवला आहे. आज आपण शिवाजी महाराज जन्माला यावेत, अशी अपेक्षा बाळगतो. पण, त्यासाठी आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याची गरज आहे. जितेंद्र आव्हाड यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. कारण, महाराष्ट्राचा विकास ज्या विचारांवर झाला. किंवा अधिकची प्रगती ज्या विचारांवर होईल, ते विचार या चित्रशिल्पातून आव्हाड यांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले आहेत. शिवरायांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होते. आज जर हाच विचार आताच्या सत्ताधार्‍यांनी अवलंबला असता तर महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता असंही ते म्हणाले. 

दरम्यान आव्हाड यांनी यावेळी चित्रशिल्पाची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, या चित्रशिल्पातून महाराष्ट्राची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विनयशील शिवराय, जिजाऊ, संत तुकाराम, जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांचे विचार सांगितले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, मनोहर साळवी, महेश साळवी, नगरसेवक अश्रफ पठाण,  नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते  मनिषा साळवी, आरती गायकवाड, रुपाली गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 

Web Title: The first 'Maharashtra craft' in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.