पहिल्या टप्यात ६ लाख ६० हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:57 PM2020-12-25T17:57:55+5:302020-12-25T17:58:10+5:30

CoronaVaccine thane: कोरोनाच्या नवीन विषाणूने देशात दस्तक दिली असली तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरु वात होण्याची शक्यता आहे.

In the first phase, 6 lakh 60 thousand essential service employees were vaccinated | पहिल्या टप्यात ६ लाख ६० हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस

पहिल्या टप्यात ६ लाख ६० हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : कोरोनाची लस आता नव्या वर्षात येणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी महापलिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार आरोग्य सेवेतील अत्यावश्यक सेवेतील ठाण्यातील सुमारे ६ लाख ६० हजार लाभाथ्र्याची यादी पालिका प्रशासनाने तयार केली असून १३२ दिवसांमध्ये लसीकरणाचे दोन्ही टप्पे पार करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. आवश्यक लसींचा साठा वेळेत उपलब्ध झाल्यास चार महिन्यात १३ लाख २० हजार लसीकरणाचे टार्गेट पूर्ण होईल असा दावा पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.


               कोरोनाच्या नवीन विषाणूने देशात दस्तक दिली असली तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरु वात होण्याची शक्यता आहे. या मोहिमेतंर्गत सुरु वातील  एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लाभाथ्र्याचे दोनवेळा लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार देशात ३३ कोटी, महाराष्ट्रात ५१ लाख तर ठाणो पालिका हद्दीत ६ लाख ६० हजार लाभाथ्र्याना कोविड प्रतिबंधक लस देण्याची योजना आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणो पालिकेने त्यासाठी आपली संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. लसीकरणासाठी मुबलक जागा असलेल्या २० आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली असून त्यासाठी १०० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथक दिवसाला ५०० लस देणार आहे. म्हणजे ठाण्यात रोज १० हजार आणि आठवड्याला ७० हजार लाभाथ्र्याचे लसीकरण होणार आहे.


 सर्वप्रथम आरोग्य सेवकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्या ६ लाख ६० हजार लाभाथ्र्याची यादी तयार आहे.  पण लसींचा मुबलक साठा आल्यास १ लाख ८० हजार फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात येईल. फ्रन्टलाईनमध्ये आयुक्तांपासून ते शासकीय, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांर्पयत प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.


 ६ लाख ६०  हजार लाभाथ्र्याचे दोनवेळा लसीकरण होणार आहे. म्हणजे १३ लाख २० हजार लसीकरणाचे मोठे आव्हान आहे. त्यातही एकाही लाभाथ्र्याचे दुस:या टप्प्यातील लसीकरण चुकता कामा नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कोणाला मिळणार पहिल्या टप्यात लस
 आरोग्य सेवक- ६०, ०००
फ्रन्टलाईन वर्कर्स - १,८०,००
५० ते ६० वयोगट- ६४,८००
६० वर्षापुढील- ४३,२००

Web Title: In the first phase, 6 lakh 60 thousand essential service employees were vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.