डोंबिवलीत लिंगपरिवर्तनाचा पहिला टप्पा यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:01 AM2019-06-22T04:01:25+5:302019-06-22T04:01:33+5:30

स्त्रीचे पुरुषात रूपांतर; नवीन ओळख मिळणार

The first phase of Dombivli transplantation is successful | डोंबिवलीत लिंगपरिवर्तनाचा पहिला टप्पा यशस्वी

डोंबिवलीत लिंगपरिवर्तनाचा पहिला टप्पा यशस्वी

Next

डोंबिवली : शहरातील एका २५ वर्षांच्या तरुणीवर लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा येथील एका रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडला. तिला जेंडर आयडेंटिटी डिसआॅर्डर किंवा जेंडर डिस्फोरिया या विकाराने ग्रासले होते. या शस्त्रक्रियेच्या मदतीने तिचे लिंग बदलून स्त्रीमधून पुरुषात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेली नवीन ओळख त्याला मिळणार आहे. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात लिंगबदल करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

डोंबिवलीत राहणारा २५ वर्षांचा आदित्य. त्याचे पूर्वीचे नाव अदिती खुराना (नाव बदलले आहे). आदित्य सेक्स रिअसाइनमेंट शस्त्रक्रिया करवून घेऊन स्त्रीपासून पुरुष झाला. आपण ज्या लिंगाशी तादात्म्य पावतो, त्याहून वेगळ्याच शरीरात आपण अडकलो आहोत, अशी भावना त्याला १३ वर्षांचा असताना जाणवू लागली. त्यामुळे लिंगबदल शस्त्रक्रियेचा पर्याय निवडणे आवश्यक असल्याचे त्याला वाटू लागले. हा विचार तेव्हा स्वत:जवळ ठेवला. तीन वर्षांपूर्वी त्याने आईजवळ आपली भावना व्यक्त करत लिंग बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा विचार बोलून दाखवला. सुरुवातीला कुटुंबीयांनी नकार दिला. पण, कालांतराने मंजुरी मिळाली.

आदित्यला जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी (जीआरएस) करवून घ्यायची होती. या शस्त्रक्रियेला सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी (एसआरएस) असेही म्हटले जाते. यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्या व मूल्यमापनांना सामोरे जावे लागते. यामध्ये कोणत्याही प्रकारची सायकोपॅथॉलॉजी नाही, हे निश्चित करण्यासाठी या चाचण्या व मूल्यमापन अत्यावश्यक आहे. एसआरएस ही एक अपरिवर्तनीय प्रक्रिया असून व्यक्तीच्या आयुष्यावर अनेक बाजूंनी परिणाम करते. त्यामुळे हा निर्णय घेणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत आहे की नाही, हे निश्चित करणे आवश्यक ठरते. आदित्यचे दोन महिने परीक्षण केले गेले. हायपोथायरॉइडिझमचा त्याला त्रास होता. त्यामुळे औषधांच्या मदतीने थायरॉइडची पातळी सामान्य झाल्यानंतर त्याला तंदुरुस्त ठेवून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शस्त्रक्रियेचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले. ही महत्त्वाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल त्याने डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त केले.

दुसरा टप्पा लिंग बदलाचा
पहिला टप्पा होता दोन्ही स्तन कमी करत नेण्याचा. यासाठी बायलॅटरल सॅल्पिंगो-ऊफेरिओहिस्ट्रेक्टॉमीत स्तनांचे आकार कमी करण्यासोबत गर्भाशय, अंडाशये आणि गर्भनलिका हे सर्व काढण्यात आले. आदित्यला आठवडाभरात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दुसºया टप्प्यात त्याच्यावर जननेंद्रियांची स्थापना करण्याची शस्त्रक्रिया होर्ईल. ्रत्यानंतर त्याला लैंगिक ओळखीशी जुळणारी शारीरिक रचना मिळेल.

Web Title: The first phase of Dombivli transplantation is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.