मनोरुग्णांचा कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा पडला पार; दोन दिवसांत २५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:46+5:302021-03-05T04:40:46+5:30
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले असून, दोन दिवसांत २५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. ठाणे ...
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले असून, दोन दिवसांत २५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.
ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पहिली लस टोचून घेऊन जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी होण्याचा मान मिळविला. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रोझा गार्डनिया येथे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. वृषाली गौरवार यांनी पहिली लस घेतली. २ फेब्रुवारी रोजी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी लस टोचून घेतली. बुधवार आणि गुरुवारी मनोरुग्णालयाच्या ओपीडीमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मनोरुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी बुधवारी १००, तर गुरुवारी १५० जणांनी कर्मचाऱ्यांनी लस घेतली. २८ दिवसांनी लसीचा दुसरा टप्पा मनोरुग्णालयात पार पडेल, असे डॉ. बोदाडे यांनी सांगितले.
---------------
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु मनोरुग्णालयात सध्या एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा मनोरुग्णालय प्रशासनाने केला आहे.
-------------
लॉकडाऊनमुळे थांबविण्यात आलेल्या मनोरुग्णांची घरवापसी अद्याप सुरुवात केलेली नाही. कोरोनाचे सावट कमी झाले की रखडलेली घरवापसी पुन्हा सुरू होणार आहे.
---------------
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जवळपास ६० मनोरुग्णांना घरी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. बोदाडे यांनी सांगितले.
.........
वाचली