डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:33 PM2018-04-10T17:33:12+5:302018-04-10T17:33:12+5:30
डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते रविवार १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत स. व. जोशी विद्यालय पटांगण, छेडा रोड,सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व येथे आयोजित केला आहे.
डोंबिवली- डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते रविवार १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते १० या वेळेत स. व. जोशी विद्यालय पटांगण, छेडा रोड,सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व येथे आयोजित केला आहे. तीन दिवस असणारा हा फेस्टीवल सायंकाळी ५ ते रात्रो १० पर्यंत सुरू राहणार आहे. यात हैद्राबादी बिर्याणी, दम बिर्याणी, बांबू आणि मटका बिर्याणी,मलाई सिख बिर्याणी, इटालियन बिर्याणी, आगरी बिर्याणी, सुरमई बिर्याणी, अवधी बिर्याणी, मटण बिर्याणी, झमझम बिर्याणी, मेयोनीज बिर्याणी,शाही बिर्याणी आणि हो शाकाहारींसाठी काश्मिरी पुलाव, मोड आलेल्या धान्यांचा वापर करून केलेली पौष्टीक स्प्राऊट ( sprout) बिर्याणी, पनीर लव्हरसाठी पनीर टिक्का बिर्याणी आणि अख्खा मसूर बिर्याणी, मश्ररूम बिर्याणी असे असंख्य बिर्याणीचे प्रकार या फेस्टीवलमध्ये उपलब्ध आहेत. बिर्याणी जागेवरच खाण्याची तसेच पार्सलची देखील सुविधा येथे असणार आहे. अशी माहिती आय़ोजक स्वराज्य इव्हेंट्सचे समर्थ व अविष्कार ग्रुपचे समीर चिटणीस यानी डोंबिवलीत पत्रकार परिषदेत दिली. चटकदार बिर्याणी खाल्यावर कुछ मिठा हो जाए...म्हणून येथे शाही तुकडा, फिरनी, तुम्ही ऑर्डर दिल्य़ावर तुमच्या समोर बनवून दिले जाणारे आईसस्क्रिम आणि पान खायचे असेल फायर पानची देखील सोय आहे. फायर पान म्हणजे पान बनवून ते पेटवले जाते आणि तसेच पेटते पान तुम्ही तोंडात कोंबले जाते, तेव्हा त्याच्या वेगळ्या स्वादात तुम्ही हरवून जाता. ठाण्यात २३, २४ ते २५ फेब्रुवारी २०१८ मध्ये बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलला २० हजारहून अधिक बिर्याणी प्रेमींनी भेट दिली आणि सहपरिवार बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद लुटला आणि इतकंच नाही तर दर्दी रसिकांनी या बिर्याणी फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या गझल,शायरी, मुशायरे या कार्यक्रमांना सुद्धा पसंती दर्शवली होती. तीच रंगत आता डोंबिवली बिर्याणी फेस्टीवलमध्ये अनुभवता येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होईल.