आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:21 AM2017-08-29T02:21:54+5:302017-08-29T02:22:12+5:30

जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.

For the first time in the first five years, the Andhra Dhar filled 92 percent, the period for the water season is still full | आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२ टक्के भरले, पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे.
कर्जतजवळील भिवपुरीजवळ आंध्रा नदीवरील पुणे जिल्ह्यात असलेले हे धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यावर ७२ मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कार्यरत आहे. यासाठी वापरलेले पाणी उल्हासनदीत सोडले जाते. त्याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि उद्योगांना होतो. या धरणातील मागील पाच वर्षातील सरासरी उपयुक्त पाणीसाठा २३५.३८ दशलक्ष घनमीटर होता. मात्र, यंदा प्रथमच ३१३.८४ दशलक्ष घनमीटर (दलघमी.) म्हणजे ९२.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. सुमारे ९४२.१० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या भातसा धरणानंतर या आंध्रा धरणाची ३३९.१४ दलघमी उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणात मागील वर्षी २२७.७५ दलघमी म्हणजे ६७.१६ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा ९२ .५४ टक्के तयार झाला आहे. या खोºयात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या धरणात झपाट्याने पाणी जमा होत आहे. आतापर्यंत धरणात २४६१ मिमी. पाऊस पडला असून मागील वर्षी याच दिनांकापर्यंत २१४३ मिमी. पाऊस पडला होता.
आंध्रा धरण्याचे पाणी भिवपुरी, भिरा येथील टाटाच्या विद्युत प्रकल्पात सोडले जाते. त्यानंतर उल्हास नदीव्दारे ठाणे जिल्ह्यात येणारे हे पाणी बारवी धरणासह बदलापूर बंधारा, जांभूळ बंधारा, मोहने बंधारा आदी ठिकाणी अडविण्यात येते. त्यानंतर एमआयडीसी, शहाड टेमघर, कल्याण-डोंबिवली, जीवन प्राधिकरण आदी प्रमुख संस्था या पाण्याचा पुरवठा पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक कारखान्यांना करतात. आंध्रा धरणासह बारवी धरणातही १०० टक्के पाणी साठ््यामुळे ठाणे पालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, बदलापूर आणि अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील ४५ गावांची पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.

Web Title: For the first time in the first five years, the Andhra Dhar filled 92 percent, the period for the water season is still full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण