पलावा सिटीत पहिल्यांदाच भरणार मिनी आॅलिम्पिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:43 AM2018-01-15T00:43:41+5:302018-01-16T19:22:43+5:30
सुमारे २९ हजारपेक्षा अधिक नागरिकांसाठी गृहसंकुल तयार केलेल्या पलावा सिटीतील रहिवाशांसाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान अनेकविध क्रीडा स्पर्धा एकाच छताखाली आयोजिल्या आहेत.
ठाणे : सुमारे २९ हजारपेक्षा अधिक नागरिकांसाठी गृहसंकुल तयार केलेल्या पलावा सिटीतील रहिवाशांसाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान अनेकविध क्रीडा स्पर्धा एकाच छताखाली आयोजिल्या आहेत. लोकमत या स्पर्धांचे माध्यम प्रायोजक आहे. गेल्या पाच वर्षात पलावा सिटीत अनेक स्पर्धा झाल्या. मात्र, आपल्याच परिसरातील रहिवाशांसाठी अशाप्रकारची मिनी आॅलिम्पिक पहिल्यांदाच आयोजिली आहे.
विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पलावा सिटीत पायाभूत सुविधांची सोय करण्यात आली आहे. फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस यासाठी स्टेडियम आहेत. माजी आंतरराष्टÑीय जलतरणपटू रूपाली रेपाळेप्रमाणे इतर अनेक आंतरराष्टÑीय, राष्टÑीय स्तरावरील खेळाडूंचे निवासस्थान पलावा सिटीत आहे. पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशन आणि पलावा स्पोर्ट्स कौन्सिलच्यावतीने या स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. स्पर्धेचा उद्धाटन सोहळा २० जानेवारी रोजी तर समारोप २८ जानेवारी रोजी होणार आहे. पलावामध्ये १६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा विविध वयोगटातील महिला आणि पुरूषांसाठी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक रहिवाशाला आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात सहभाग घेता येणार आहे. यात जलतरण, टेबल टेनिस, पूल, कॅरम, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, स्क्वॅश, रनिंग, सायकलिंग, लॉन टेनिस, बॅडमिंटन, कराटे आणि बुद्धिबळ या खेळांचा समावेश आहेत. याशिवाय २६ जानेवारी रोजी वॉकथॉन, कौटुंबिक रन, जिमिंग, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक खेळात पाच हजाराहून रहिवासी सहभागी होण्याची शक्यता असून वयोगटानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाºयांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास रहिवासी उत्सुक असून शहरातील सर्व क्रीडापटूंना एकाच व्यासपीठावर आणून क्रीडा संस्कृती निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.