पहिले ‘शी टॉयलेट’ डोंबिवलीत

By admin | Published: July 13, 2016 01:50 AM2016-07-13T01:50:43+5:302016-07-13T01:50:43+5:30

ठाणे जिल्ह्यातील पहिले शी टॉयलेट (महिलांसाठीचे स्वच्छतागृह) चंद्रकांत पाटकर ट्रस्टने मंगळवारी स्टेशन परिसारत सुरू केले.

First 'Toilet' Dombivliat | पहिले ‘शी टॉयलेट’ डोंबिवलीत

पहिले ‘शी टॉयलेट’ डोंबिवलीत

Next

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील पहिले शी टॉयलेट (महिलांसाठीचे स्वच्छतागृह) चंद्रकांत पाटकर ट्रस्टने मंगळवारी स्टेशन परिसारत सुरू केले. त्या जागी ई टॉयलेट आणि शी टॉयलेट अशा दोन्ही सुविधा असतील. त्यांचा वापर करण्यासाठी दोन रूपये आणि पाच रूपये मोजावे लागतील.
या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला, तर शहरात अन्य चार ठिकाणी अशी टॉयलेट सुरु करण्याचा मानस उपक्रमाच्या प्रमुख जयंती पाटकर यांनी व्यक्त केला आहे.
रेल्वे स्थानकांजवळ कॅनरा बॅकेनजिक ते आहे. ते मनुष्यविरहित असल्याने सुरक्षेची चिंता नाही. नाणी टाकून त्याचा वापर करावा लागेल. या टॉयलेटमध्ये स्वयंस्वच्छता, सेल्फ फ्लशिंगची क्षमता आहे. त्याला शून्य देखभाल लागते. शी टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन्ससाठी व्हेंडिग मशीन व वापरलेल्या नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची सोय आहे. त्यासाठी १४ लाखांचा खर्च आला आहे.
या उपक्रमांचा शुभारंभ नगरसेविका सायली विचारे व इंदिरा तरे यांच्या हस्ते करण्यात आला. स्थायी समितीच्या सदस्या ज्योती मराठे, शिवसेनेच्या सदस्या छाया वाघमारे, शी टॉयलेट सुरू करणारे व्हेंडर अन्वर सदाथ उपस्थित होते.

Web Title: First 'Toilet' Dombivliat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.