भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न

By सुरेश लोखंडे | Published: April 7, 2024 09:03 PM2024-04-07T21:03:39+5:302024-04-07T21:03:54+5:30

या प्रशिक्षणाकरीता नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 83%  इतकी होती. हे प्रशिक्षण दोन टप्यात घेण्यात आले.  

First training for fifth phase election under Bhiwandi Lok Sabha Constituency completed | भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न

भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न

ठाणे : जिल्हाध‍िकारी व जिल्हा निवडणूक अध‍िकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार   23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या 134 भिवंडी ग्रामीण मतदारसंघामधील 2 हजार 9 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आज दि.07 एप्रिल 2024 रोजी फरहान खान हॉल, मिल्लत नगर भिवंडी येथे ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व अलनुर गर्ल स्कुल मिल्लत नगर भिवंडी येथे ईव्हीएम हँण्डस् ऑन ट्रेनिंग संपन्न झाले. 

या प्रशिक्षणाकरीता नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 83%  इतकी होती. हे प्रशिक्षण दोन टप्यात घेण्यात आले.  सकाळी 10:00 ते 12:00 व दुपारी 02:00 ते 04:00 या दोनही वेळांमध्ये ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व ईव्हीएम हँण्डस्ऑन ट्रेनिंग देण्यात आले.  दोनही प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान अधिकारी / कर्मचारी यांची गैरसोय होवू नये म्हणून जागोजागी दिशादर्शक फलक / हजेरी नियोजन फलक लावण्यात आले होते.  तसेच वैद्यकीय पथकाची देखील प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपलब्धता होती. त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन  विभागाचे फायर टेंडर फरहान खान हॉल येथे उभे करण्यात आले होते. येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या पार्किंगसाठी दोन्ही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.  फरहान खान हॉल शेजारी प्रशिक्षणासाठी पेंडॉल टाकण्यात आलेला होता.

या पेंडॉलमधील मतदान अधिकारी/कर्मचारी यांना उन्हाळयाचा त्रास होवू नये म्हणून कुलर व फॅनची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली होती. तसेच  प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्यात येऊन चहा बिस्कीटचीही व्यवस्था करण्यात आलेली होती.  एकंदरीत प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे नियोजन हे चांगल्या प्रकारे केलेले होते.  तसेच ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विकास गजरे,  यांनी स्वत: अतिशय साध्या  व सोप्या भाषेमध्ये चांगल्या प्रकारे दिले.  त्यामुळे मतदान अध‍िकारी कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

Web Title: First training for fifth phase election under Bhiwandi Lok Sabha Constituency completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.