भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

By धीरज परब | Published: November 4, 2022 03:31 AM2022-11-04T03:31:23+5:302022-11-04T03:34:43+5:30

वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे.

Fishermen of Bhayander were caught 100 kg stingray fish | भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भाटेबंदर येथील एका लहान बोटीतील मच्छीमाराच्या गळाला क्वचित सापडणारा वाघ्या पाकट हा मासा लागला. वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे. 

भाटे बंदर येथील मच्छीमार सुनील याची विना इंजिनची लहान एकविरा आई नावाची मासेमारी बोट आहे. सुनील व त्याचा भाऊ हे समुद्रातील खडकात मिळणाऱ्या शेवंडया पकडतात तसेच ज्या भागात चिखल असतो तिकडे गळ टाकून मासेमारी करतात. साधी बोट असल्याने किनाऱ्या पासून सकाळी अर्धा एक तास आत जातात व दोन तासात पुन्हा किनारी येतात. 

गुरुवारी सुनील  व त्याचा भाऊ गळ टाकून मासेमारी करत असताना गळाला भला मोठा वाघ्या पाकट मासा लागला. इतका मोठा मासा आणि तोही क्वचित सापडणारा वाघ्या पाकट मिळाल्याने दोघेही खुश झाले.  वाघ्या पाकट शरीरासाठी चांगला मानला जात असल्याने त्याला मागणी सुद्धा आहे. 
 

Web Title: Fishermen of Bhayander were caught 100 kg stingray fish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.