वाढवण बंदरच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये मच्छीमारांची निदर्शने 

By धीरज परब | Published: October 2, 2022 03:17 PM2022-10-02T15:17:40+5:302022-10-02T15:18:03+5:30

Vadhvan port: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित करण्यासाठी स्थानिक मच्छीमार ,शेतकरी यांना उध्वस्त करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा देत भाईंदर मधील मच्छीमारांनी निदर्शने केली व वाढवणच्या मच्छीमार - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

Fishermen protest in Bhayandar against Vadhvan port | वाढवण बंदरच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये मच्छीमारांची निदर्शने 

वाढवण बंदरच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये मच्छीमारांची निदर्शने 

Next

- धीरज परब 
मीरारोड - पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित करण्यासाठी स्थानिक मच्छीमार ,शेतकरी यांना उध्वस्त करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा देत भाईंदर मधील मच्छीमारांनी निदर्शने केली व वाढवणच्या मच्छीमार - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

वाढवण बंदर संघर्ष समितीच्या वतीने आज रविवार २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीच्या अनुषंगाने वाढवण बंदर प्रकल्पा विरुद्ध आंदोलनाची हाक दिली होती . भाईंदरच्या चौक व उत्तन - पाली भागात मच्छीमारांनी आंदोलनात सहभागी होत निदर्शने केली . दि डोंगरी चौक फिशरमन सर्वोदय सहकारी संस्था च्या वतीने चौक येथील निदर्शनात विल्यम गोविंद सह अनेक मच्छीमार सहभागी झाले होते.

तर उत्तन  वाहतूक सोसायटीच्या वतीने साखळी उपोषण व निदर्शने करण्यात आली . सोसायटीचे अध्यक्ष बस्त्याव भंडारी , व्यवस्थापक  बोना मालू , माजी नगरसेविका शर्मिला बागाजी, माजी अध्यक्ष माल्कम भंडारी, डेनिस नून व फ्रेडी भंडारी , संचालक फ्रँकी गाडेकर ,  रिचर्ड नून, गॉडफ्री वसईकर सह मोठ्या संख्येने मच्छीमार आंदोलनात सहभागी झाले होते . पाली येथे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

केंद्र तसेच राज्यातील भाजपा व एकनाथ शिंदे गट सरकारने वाढवण बंदरचा प्रकल्प अमलात आणण्यासाठी दबावतंत्र सुरु केले आहे . खाजगी उद्योगपती साठी स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा कट सरकारने आखला असल्याचा आरोप यावेळी मच्छीमारांनी केला . 

Web Title: Fishermen protest in Bhayandar against Vadhvan port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.