आजपासून मच्छीमारी बंद
By admin | Published: June 1, 2017 04:41 AM2017-06-01T04:41:30+5:302017-06-01T04:41:30+5:30
: राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीच्या बंदीचा आदेश जारी केला आहे. त्या पाशर््वभूमीवर मच्छीमारांनी
अनिरु द्ध पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : राज्य शासनाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीच्या बंदीचा आदेश जारी केला आहे. त्या पाशर््वभूमीवर मच्छीमारांनी किनाऱ्यावर होड्या नांगरल्या आहेत. त्यामुळे माशांची आवक घटून भाव गगनाला भिडणार असल्याने जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खवयांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्र मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये या वर्षी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या
सागरीक्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घातली
आहे. तिचा भंग
करणाऱ्यां विरूद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. शिवाय बंदी कालावधीत मासेमारी करतांना नौकेला अपघात घडल्यास शासकीय मदत वा पुनर्वसनाकरिता नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
या वेळी मच्छीमाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही पद्धतीचे अर्थसाह्य दिले जाणार नाही. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या संस्थांच्या सदस्यांचे राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेखाली पुरस्कृत केलेले अर्ज अर्थसाह्यासाठी शिफारस केले जाणार नाहीत. शिवाय कोणत्याही अर्थसाह्य योजनांच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवले जाईल. अशा नौकांच्या मालकांविरुद्ध कारवाई केली जाईल. ही माहिती मागविणारे अर्ज सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडून मच्छीमार सोसायट्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान माशांचा प्रजनन कालावधी, शिवाय जोराचा पाऊस आणि प्रचंड उधाण तसेच वादळ यामुळे अशा नौकांना अपघात घडण्याची दाट शक्यता असते.
त्या पाशर््वभूमीवर डहाणू तालुक्याच्या ३५ किमी आणि तलासरी तालुक्यातील चार किमी लांबीच्या सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांनी होड्या नांगरल्या आहेत. आगामी दिवसात झावळी, प्लास्टीक व ताडपत्रीच्या साह्याने होड्या शाकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल. शेवटच्या फेरीत सापडलेले मासे येत्या आठवड्यापर्यंतच बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने मच्छीबाजार तेजीत आहे.
‘‘खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने आठवडाभर पुरतील इतकेच मासे कोळीणींकडे उपलब्ध आहेत.’’
- उशाबेन माच्छी, मासेविक्र ेती महिला
झाई मासेमारी केंद्रावरील २५ मोठ्या यांत्रिक नौका आणि १२ नॉटिकलच्या आत मासेमारी करणाऱ्या सुमारे शंभर होड्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत.’’
- सुरेश दवणे, सेक्र ेटरी, झाई मांगेला समाज मच्छिमार सोसायटी