सिंधुदुर्गात मच्छीमारांचा वाद मिटला

By Admin | Published: November 24, 2015 01:37 AM2015-11-24T01:37:46+5:302015-11-24T01:37:46+5:30

पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छीमार यांच्यात मच्छीमारी वरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जसा यशस्वी तोडगा काढला तसा

Fishermen's dispute in Sindhudurga ended | सिंधुदुर्गात मच्छीमारांचा वाद मिटला

सिंधुदुर्गात मच्छीमारांचा वाद मिटला

googlenewsNext

पालघर : पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छीमार यांच्यात मच्छीमारी वरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जसा यशस्वी तोडगा काढला तसा तो वसई-पालघरमधील मच्छीमारांच्या बाबतीत पालकमंत्री सवरा कधी काढणार असा प्रश्न मच्छीमारांत निर्माण झाला आहे. पारंपरिक मच्छीमारांनी ५ नॉटीकल मैलापर्यंत तर मिनी पर्ससीनधारकांनी ५ ते १२ नॉटीकल मैलापर्यंतच्या सागरीक्षेत्रात मच्छीमार करण्याची मर्यादा शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आखून दिली. या निर्णयास पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांनी संमती दर्शविली असून या निर्णयामुळे शांततेचे व सलोख्याचे वातावरण निर्माण होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक मच्छीमारांमध्ये मासेमारी व्यवसायावरून वाद निर्माण झाला होता. पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन यांच्यात उद्रेक निर्माण होऊन वातावरण तंग झाले होते. जाळपोळ यासारख्या घटनादेखील घडल्या होत्या. या वादावर तोडगा काढण्यासाठी मच्छीमारांची शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पारंपरिक व मिनी पर्ससीन मच्छीमारांचे प्रतिनिधी, सरपंच, मत्स्य विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आचरा गावात उद्रेक झाला होता.
या उद्रेकावर मार्ग काढण्याची व आचरा गावात शांती, गावपण टिकविले जावे यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आचरा गावात १८ मिनी पर्ससीन मिच्छमार तर १६० पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यांनी समुद्रात किती अंतरापर्यंत मच्छीमारी करावी यासाठी निर्बंध आखून देण्यात आले. जी तप्तरता पालकमंत्री केसरकर आणि खासदार विनाय राऊत यांनी दाखविली ती तत्परता पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा कधी दाखविणार असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांत चर्चिला जात आहे.
वादावर काढलेला पर्याय यशस्वी झाल्यास जिल्हयÞात इतर ठिकाणीही असेच वाद मिटविले जातील. सध्या पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन, पारंपरिक, यांत्रिकी व परराज्यातील पर्ससीनधारकांमध्ये मासेमारीवरून वाद सुरु आहेत. या वादावरही कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन कायद्याचा अंमल होईल यादृष्टीने तोडगा काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fishermen's dispute in Sindhudurga ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.