एमआयडीसीमध्ये चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:43 AM2021-08-22T04:43:24+5:302021-08-22T04:43:24+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या सात आरोपींपैकी पाच आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी एमआयडीसी भागातील ...
अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या सात आरोपींपैकी पाच आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी एमआयडीसी भागातील दोन कंपन्यांमध्ये चोरी केली होती. त्यांच्याकडून ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबरनाथ एमआयडीसी भागातील रेसटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ५ ऑगस्ट रोजी रात्री अनोळखी चोरट्यांनी प्रवेश केला व सुरक्षारक्षकाला खुर्चीला बांधून कॉपर प्लेट चोरून नेल्या. त्याची किंमत एक लाख ७७ हजार रुपये होती. कंपनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारे अंबरनाथ बारकुपाडा भागातील आकाश वळवे या बिगारी कामगाराला पोलिसांनी अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता या चोरीमध्ये इतर सहा साथीदारांचा सहभाग उघड झाला. आरोपींपैकी मनोज वाघे, संदीप वाघे, काशिनाथ वाघे आणि सुनील वळवे या आरोपींना पोलिसांनी अटक केली. उत्तम सवर आणि विठ्ठल पांढरे हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. या सर्व आरोपींकडे चौकशी केली असता १३ जुलै रोजी अंबरनाथच्या एमआयडीसीमधील आणखीन एका कंपनीत चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. या आरोपींचा आणखीन कोणकोणत्या गुन्ह्यांत सामावेश आहे का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
----------फोटो आहे.
...........