जिल्ह्यात पाच कोटींची भातखरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:29 PM2020-01-01T22:29:30+5:302020-01-01T22:29:37+5:30
आदिवासी विकास महामंडळ : शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सहा केंद्रांची केली व्यवस्था
भातसानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत आतापर्यंत जवळजवळ पाच कोटी रूपयांच्या दरम्यान भातखरेदी करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील सहा केंद्रांवर लाखो रुपयांची खरेदी झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील आठ भातखरेदी केंद्रांवर २७ हजार १३४.१७ क्विंटल भातखरेदी करण्यात आली असून त्याची किंमत चार कोटी ९२ लाख ४९ हजार ५३४.९५ रुपये इतकी आहे.
शहापूर तालुक्यातील सहा केंद्रांवर भातखरेदी झाली. यामध्ये आटगाव केंद्रात ७५ लाख एक हजार ६६७.२५ रु पयांचा ४१३३.१५ क्विंटल भातखरेदी करण्यात आला आहे. किन्हवली केंद्रात ५७ लाख ४१ हजार २६.५० रु पयांचा तीन हजार १६३.१० क्विंटल, अघई केंद्रात १२ लाख ३५ हजार ९६०.५५ रु पयांचा ६८०.९७ क्विंटल, चौंढा या केंद्रात २३ लाख ९४ हजार ९६५ .१० रु पयांचा सात हजार १४६.७५ क्विंटल, खर्डी केंद्रात एक कोटी २९ लाख ७१ हजार ३५१.२५ रुपयांचा ७१४६.०५ क्विंटल, मढ-अंबरजे या केंद्रात एक कोटी ५८ लाख ९५ हजार ८६०.७५ रु पयांचे आठ हजार ७५८.०५ क्विंटल तर मुरबाड येथील धसई येथील केंद्रात ३५ लाख आठ हजार ७०३ रु पयांचा एक हजार ९३३ क्विंटल भातखरेदी करण्यात आली आहे.
‘अ’ ग्रेड असणाºया भाताला एक हजार ८३५ तर साधारण धान्यासाठी एक हजार ८१५ रु पये हमीभाव देण्यात आला आहे.
एकंदरीत ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत चार कोटी ९२ लाख ४९ हजार ५३४ रुपयांची २७ हजार १३४ क्विंटल इतकी खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी ती याहीपेक्षा अधिक होती.
त्यामानाने ती कमी आहे. यावर्षी अधिक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात भातपिके कुजल्याने खरेदीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून
आले. सहा केंद्र सुरू झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसामुळे आमचे खूप नुकसान झाले असे केंद्राच्या ठिकाणी भात विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी सांगितले.
सध्या शहापूर तालुक्यातील भातखरेदी केंद्रांवर बºयापैकी भातखरेदी सुरू आहे. अनेक समस्यांचा सामना करूनही खरेदी केली जात आहे. - एस.एल. राजुरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, शहापूर
यावर्षी अधिक पाऊस पडल्याने भातपिकांचे मोठे नुकसान झाल्याने भातखरेदी अतिशय कमी झाली आहे.
- काशिनाथ पष्ठे,
जि.प. सदस्य