भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:18 AM2018-07-25T04:18:28+5:302018-07-25T04:19:04+5:30
मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे.
ठाणे : मुंबईसह ठाणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सुमारे ७८ टक्के पाणीसाठा होताच सुरक्षेच्या दृष्टीने पाच दरवाजे उडण्याचे नियोजन आहे. मात्र, यंदा मंगळवारी सायंकाळपर्यंत ८००.८६४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८१.४० टक्के पाणीसाठा तयार झालेला आहे. तरीदेखील दरवाजे उडण्यास विलंब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने धरणात पाणीसाठा वाढताच ते आपोआप उघडत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
दरवाजे उडण्याच्या दृष्टीने सोमवारी एक दरवाजा ५० सेंमी. उघडून काही वेळेनंतर बंद करून त्याची चाचणी केली गेली. धरणात समाधानकारक पाणीसाठा होताच प्रशासनाकडून पाच दरवाजे सुमारे एक मीटरने उडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
तत्पूर्वी भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहापूर, भिवंडी, कल्याण तहसीलदारांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणाची पाणी पातळी नियमित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जातील. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकिनारी राहणाºया नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.