पाच लाखांच्या वीमा कवचामुळे बुडीत बँकांच्या खातेदारांना दिलासा- पुरुषोत्तम रुपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 08:54 PM2021-12-12T20:54:32+5:302021-12-12T20:56:32+5:30

ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रतिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.

Five lakh insurance cover gives relief to bank account holders - Purushottam Rupala | पाच लाखांच्या वीमा कवचामुळे बुडीत बँकांच्या खातेदारांना दिलासा- पुरुषोत्तम रुपाला

पाच लाखांच्या वीमा कवचामुळे बुडीत बँकांच्या खातेदारांना दिलासा- पुरुषोत्तम रुपाला

Next

ठाणे: केंद्रीय अर्थमंत्रलयाने बँकींग क्षेत्रत केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी मिळणार आहे. एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्यांना पाच लाखांपर्यंतची रक्कम ९० दिवसांमध्ये देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. त्याचा महाराष्ट्रासह देशभरातील बँक खातेदारांना मोठा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मत्सव्यवसाय तथा दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले.

ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रतिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी या खात्यादारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, एकेकाळी बँक ही केवळ व्यावसायिक, उद्योजक आणि उच्च मध्यमवर्गीयांच्याच ठेवी ठेवण्यासाठी म्हणून ओळखली जात होती. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या जनधन योजनेमुळे तिची ओळख सर्वसामान्यांसाठीही झाली. त्यामुळेच ४० कोटी ग्राहक बँकांशी जोडले गेले. 

जनधन योजनेत खाते उघडण्यासाठी लोकांकडे शंभर रु पये देखिल नाहीत. याची जाणीव झाल्यानंतर शून्य बचत खात्याद्वारेही जनधनचे खाते उघडण्याची परवानगी दिली. शून्यापासून सुरु झालेल्या या खात्यांमध्ये आता ६० हजार कोटी बँकामध्ये जमा झाले. बँकींग क्षेत्रत जनतेचा विश्वास निर्माण होण्याचे काम मोदींच्या या योजनेमुळे झाले. आता याच धर्तीवर डीबीटीची (डायरेक्ट बेनेफिट) योजना राबविली. दिवाळखोरीत निघालेल्या बँकांमधून पूर्वी एक लाखांचे वीमा कवच दिले जायचे. ते आता वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या ग्राहकांना न्याय मिळाला आहे. पूर्वी हे एक लाख रुपये मिळविण्यासाठीही खूप अडचणी येत होत्या. 

आता ही संपूर्ण प्रक्रीया सुलभ केली आहे.यावेळी परेश शाह यांना एक लाख ३३ हजार आणि िवना िदनी समेळ यांना पाच लाख रुपये असे दोन धनादेश खातेदारांना रुपाला यांच्या हस्ते देण्यात आले. ठाणे जिल्हयात या योजनेचे १८५ लाभार्थी असून त्यांना एक कोटी ६५ लाख रुपये दिले जाणार आहेत. यातील सुमारे १०० ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयानंद भारती यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या या डीआयसीजीसी योजनेमुळे आपल्याला एक लाख ८० हजार रुपये मिळाले. याचा विशेष आनंद असल्याचे ८४ वर्षीय विनायक जोशी (सिटी को ऑपरेटीव्ह बँकेचे खातेदार) यावेळी म्हणाले. याच योजनेमुळे आई वडिलांसह आपली दीड लाखांची रक्कम बँकेत जमा झाल्यामुळे अनिता गंधे यांनीही समाधान व्यक्त केले.यावेळी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेल्या मार्गदर्शनाची चित्रफितही याच कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आली.

Web Title: Five lakh insurance cover gives relief to bank account holders - Purushottam Rupala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे