बनाव करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:10 AM2018-05-04T06:10:46+5:302018-05-04T06:10:46+5:30
अॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करून एका खासगी क्लासेसमध्ये येऊन छापा टाकण्याचा बनाव करणाºया पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ठाणे : अॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) अधिकारी असल्याची बतावणी करून एका खासगी क्लासेसमध्ये येऊन छापा टाकण्याचा बनाव करणाºया पाच जणांच्या टोळीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ठाण्याच्या तीन पेट्रोलपंप येथील बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेणाºया क्लासेसमध्ये २८ एप्रिल रोजी दुपारी पाच जणांच्या टोळीने शिरकाव केला. कारमध्ये वरिष्ठ अधिकारी असून क्लासची संपूर्ण तपासणी करायची आहे. त्यामुळे तुम्हाला काही रक्कमही द्यावी लागेल, असाही दावा त्यंनी क्लासेसचे मुख्य प्राध्यापक अलवेन जेविन परेझ यांच्याकडे केला. दुपारी ४.३० पर्यंत या टोळीचे नाटक सुरू होते. प्रा. अलवेन यांच्या मदतीला क्लासेसचे इतर कर्मचारी आल्यानंतर मात्र या टोळीने काढता पाय घेतला. नंतर, त्यांनी ठाण्याच्या एसीबीच्या कार्यालयात चौकशी केल्यानंतर असे कोणतेही अधिकारी छापा टाकण्यासाठी गेलेच नव्हते, अशी माहितीही उघड झाली. याप्रकरणी त्यांनी २ मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.