Jitendra Awhad : अभियंता मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 04:44 PM2020-04-09T16:44:10+5:302020-04-09T16:48:52+5:30
Jitendra Awhad News : आव्हाड यांनाही या प्रकरणात आरोपी केले जावे तसेच संबंधित सुरक्षा रक्षक पोलिसांचे निलंबन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभियंता अनंत करमुसे यांना मारहाण झाल्याप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षातील भाजपचे नेते आक्रमक पवित्र्यात असतांनाच वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भाजपने मात्र, आव्हाड यांनाही या प्रकरणात आरोपी केले जावे तसेच संबंधित सुरक्षा रक्षक पोलिसांचे निलंबन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.च्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या पाचही जणांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
करमुसे यांना आव्हाड त्यांच्या घोडबंदर येथील निवासस्थानातून चौघा पोलिसांनी ५ एप्रिल रोजी नेले होते. त्यानंतर त्यांना फेसबुकवर पोस्ट का टाकलीस, अशी विचारणा करीत आव्हाड यांच्या बंगल्यावर १५ ते २० जणांनी जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले होते. उपचारानंतर करमुसे यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी या पाच जणांना अटक केली. आरोपींची ओळखपरेड बाकी असल्यामुळे त्यांची नावे उघड करण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शविली. दरम्यान, आव्हाड यांच्याकडे नियुक्तीला असलेले सुरक्षा रक्षक पोलीस फिर्यादी करमुसे यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांचा या मारहाणीमध्ये सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याचे वागळे इस्टेट परिमंडळांचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले. या संबंधित सीसीटीव्ही चित्रणाचीही पडताळणी सुरु असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.