शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

By पंकज पाटील | Published: June 28, 2023 09:12 PM2023-06-28T21:12:10+5:302023-06-28T21:12:36+5:30

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे.

Five students were injured when a board fell on the arch of the school | शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

googlenewsNext

अंबरनाथ: अंबरनाथच्या फनशीपाडा परिसरात असलेल्या होली फेथ शाळेत मुख्य प्रवेश दरावर असलेला फलक पडल्याने पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून उर्वरित दोन जखमी रुग्णांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. या शाळेतील विद्यार्थी प्रवेश धारा बाहेर पडत असताना शाळेच्या मुख्य प्रवेशदराच्या कमानीला लावलेला फलक पडल्याने पाच विद्यार्थ्यांनी जखमी झाले. त्यातील तीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली तर शेयली सिंग आणि अन्वी सिंग असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या विद्यार्थ्यांचे उपचाराची सर्व जबाबदारी शाळा प्रशासनाने घेतली असून पालकांनी देखील या प्रकरणात कोणतेही तक्रार शाळेविरोधात केलेली नाही.

Web Title: Five students were injured when a board fell on the arch of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.