पाच झाडांचा बळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:50 AM2017-07-26T00:50:02+5:302017-07-26T00:50:04+5:30
डोेंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील पाच मोठी वृक्षे अचानक सुकली आहेत. चैत्र पालवी फुटल्यानंतर पावसाळ््यात प्रत्येक झाड अधिक बहरते. मात्र, ही झाडे सुकल्याने त्यांचा कोणी जीव घेतला आहे, का असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यालगत अनेक झाडे आहेत. उन्हाळ््यात या झाडाची सावली वाटसरूंना दिलासा देते. त्याचबरोबर परिसरातील वातावरण थंड राहते. मात्र, महाविद्यालयाबाहेरील पाच झाडे भर पावसातही बहरलेली नाहीत. झाडे सुकल्याने त्यांना एकही पान नाही. त्यामुळे बुंध्यासह फांद्यांचा केवळ निष्पर्ण सापळा उरला आहे. पाऊस इतका पडूनही झाडांना एकही पाने का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही मंडळींनी ही झाडे रसायने टाकून मारली आहेत. त्यात झाडांचा बळी गेला आहे का?, अशी शंका डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी उपस्थित केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र अधिकाºयांकडे केली आहे.
या झाडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यास झाडांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, याचे कारण समजू शकेल. या परिसरातील अन्य झाडे पावसाळ््यात हिरवीगार झाली आहेत. मात्र, पाच झाडेच सुकली आहेत.
दरम्यान, या मागणीचा प्रत त्यांनी महापौर, उद्यान अधीक्षक, एमआयडीसी अभियंता, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना सादर केली आहे.