विनयभंग करणाऱ्या विक्रेत्याला पाच वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:24 AM2021-09-07T00:24:28+5:302021-09-07T00:27:23+5:30
किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया मदन प्रजापती (२४, रा. नेरुळ, नवी मुंबई) याला ठाणे जिल्हा ( विशेष पोस्को) न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रु पये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया मदन प्रजापती (२४, रा. नेरुळ, नवी मुंबई) याला ठाणे जिल्हा ( विशेष पोस्को) न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रु पये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास त्याला तीन महिने सश्रम कारावासा अतिरिक्त शिक्षाही सुनावली आहे.
पीडित १२ वर्षीय मुलगी ६ जुलै २०१५ रोजी सांयकाळच्या वेळी प्रजापती याच्या किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेली होती. तेंव्हा यातील आरोपीने मुलीला वही दाखविण्याच्या बहाण्याने दुकानात बोलविले. तिला चॉकलेटचेही आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी नेरु ळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्यासमोर सुनावणीसाठी आल्यानंतर सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेले पुरावे आणि सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने ग्राहय मानली. त्याच आधारे आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रु पये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश पालांडे यांनी केला. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार प्रभाकर महाजन यांनी काम पाहिले.