पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त
By admin | Published: June 21, 2017 04:25 AM2017-06-21T04:25:22+5:302017-06-21T04:25:22+5:30
गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे यंदाच्यावर्षी राज्यात पाण्याचे मागच्या वर्षीच्या तुलनेत दुर्भिक्ष्य नाही. येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय भाजप सरकारने डोळ््यासमोर ठेवले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.
केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याण स्पोर्ट कॉमप्लेक्समध्ये जनहिताचे कुठले निर्णय घेतले याची माहिती देणारा कार्यक्रम झाला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी जेएनपीटीचे व्यवस्थापक डी. नरेश, विश्वस्त विवेक देशपांडे, आमदार नरेंद्र पवार आणि उपमहापौर मोरश्वर भोईर आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे ११ हजारापेक्षा अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. ही योजना भाजपा सरकारने प्रभावीपणे राबवली. त्यामुळे यावर्षी मे अखेरीस पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली नाही. संरक्षण साधन सामग्रीची टक्केवारी ५० वर नेली. यूपीए सरकारच्या काळात हीच टक्केवरी केवळ १० होती. त्यात ४० टक्के वाढ केली आहे. सर्जिकल स्ट्राईक करुन शत्रू राष्ट्राला चांगलाच धडा शिकवला. सरकार सगळ््याच बाबतीत सतर्क व संवेदनशील आहे. आधारकार्ड, मोबाइल आणि कॅशलेसमुळे विविध ९२ जनहितकारी योजनांचा लाभ कोणत्याही दलालांशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. हे सरकार पारदर्शक व गतीमान आहे, असे ते म्हणाले.