तक्रारींचे निराकरण जलदगतीने करा!, आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:58 AM2017-08-29T01:58:04+5:302017-08-29T01:58:07+5:30
विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिका-यांना दिले.
कल्याण : विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिकाºयांना दिले. ई गव्हर्नन्स विभागाचे कामकाज सक्षम करण्याच्या दृष्टीने या विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातही सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सूचना केल्या.
महापालिकेत दर सोमवारी होणाºया साप्ताहिक आढावा बैठकीत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला जातो. या बैठकीत वेलरासू यांनी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने केलेल्या नियोजनाचा आढावाही घेतला. त्यात त्यांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून घेतली.
विसर्जनासाठी महापालिकने कल्याण व डोंबिवली येथे कृत्रीम तलाव तयार केलेले आहेत. या तलावांमध्ये दीड दिवसाच्या पाच हजार ११४ मूर्तींचे विसर्जन शनिवारी झाले. महापालिकेने गणेशोत्सवात होणारे प्रदूषण टाळण्यावर अधिक भर दिला आहे.
त्यापार्श्वभूमीवर भाविकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन वेलरासू यांनी या वेळी केले. त्यानंतर प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना प्रभागा अंतर्गत स्वच्छता ठेवणे, शहरातील बॅनर-होर्डिंग काढणे, याशिवाय नागरिकांकडून प्राप्त तक्र ारींचे निराकरण जलदगतीने करण्याच्या सूचना वेलरासू यांनी दिल्या.
सिस्टीम मॅनेजर आणि अॅनालिस्ट
पदे भरणार
ई गर्व्हनन्सप्रणाली राबवणारी केडीएमसी ही राज्यातील महापालिका आहे. सध्या हीच प्रणाली राज्यातील अन्य नगरपालिका, महापालिकांमध्ये राबवली जात आहे.
मात्र, आतापर्यंत केडीएमसीचा कारभार कितपत पेपरलेस झाला? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. असे असताना येथील ई गर्व्हनन्स विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्याचा निर्णय वेलरासू यांनी घेतला आहे. या विभागातील सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम अॅनालिस्टही प्रभारी पदे कायमस्वरूपी तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
केडीएमटीचे
उत्पन्न वाढवा!
परिवहन विभागातील कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त वेलरासू यांनी परिवहन महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांना परिवहन सेवा सक्षम करण्याचे आदेश दिले. ज्यामार्गावर जास्त प्रवासी आहेत, अशा मार्गांवर जादा बस गाड्या सोडाव्यात, प्रवाशांना
जास्तीत जास्त दिलासा कसा मिळेल, याचे नियोजन करावे,
अशा सूचना दिल्या. आवश्यकत्या भासल्यास नवीन बसवर
चालक-वाहक यांची संख्या वाढवून, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्यत्न करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.