त्या रुग्णांलयांच्या बाहेर पालिकेने लावले दर पत्रकांचे फ्लेस्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 04:02 PM2020-05-18T16:02:44+5:302020-05-18T16:05:03+5:30
अवाजवी दर लावून वसुली करणाºया खाजगी रुग्णांलयांच्या ठिकाणी आता पालिकेने फ्लेक्स लावले आहेत. त्यानुसारच आता दर आकारणी करावी, त्याअनुषंगानेच बिल अदा केले जावे अशा सुचना पालिकेने दिल्या आहेत.
ठाणे : कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रूग्णालय व्यवस्थापनांकडून महापालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी बिल वसूल करत असल्याच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी अवाजवी बिल वसुल करणाºया खासगी रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची अडवणूक टाळण्यासाठी परिमंडळ स्तरावर समिती गठित केली आहे. तर पालिकेने जे दर निश्चित केले आहेत, त्याचे दरपत्रकच पालिकेने आता त्या खाजगी रुग्णांलयांच्या लावण्यात आले आहेत.
त्या त्या परिमंडळाचे उपायुक्त हे त्या समितीचे अध्यक्ष असून वैद्यकिय आरोग्य अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष किंवा सचिव आणि संबंधित रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी आदींचा या समितीमध्ये समावेश आहे. दरम्यान आता महापालिकेच्या माध्यमातून जे दर निश्चित करण्यात आले आहेत, त्यांचे फ्लेक्स हे त्या त्या रुग्णालयांच्या बाहेर लावण्यात आले आहेत. त्यानुसारच रुग्णालय व्यवस्थापनाने दर आकारावेत असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच रुग्णांना देखील त्यानुसारच बिल द्यावे असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी रु ग्णाकडून प्रतिदिन चार हजार, त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. शेअरींग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार, तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रु पये आकरले जाणार आहेत. त्यात रु ग्ण खोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रु पये आकारले जाणार असून व्हेंटीलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रु पये आकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रु ग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा रु ग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय पालिकेने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचारासाठी सुविधाही दिली आहे. परंतु या नुसार दर आकारले गेले नाहीत, जास्तीचे दर आकारले गेले तर संबधींत रुग्णालयावर कारवाई केली जाईल असा इशाराही पालिकेने दिला आहे.