बांधकामे जमीनदोस्त
By admin | Published: February 20, 2017 05:38 AM2017-02-20T05:38:40+5:302017-02-20T05:38:40+5:30
उत्तन व गोराईच्या वेशीवर सरकारी जागा बळकावून बेकायदा बांधलेले बंगले व अन्य बांधकामे महसूल विभागाने जमीनदोस्त केले
मीरा रोड : उत्तन व गोराईच्या वेशीवर सरकारी जागा बळकावून बेकायदा बांधलेले बंगले व अन्य बांधकामे महसूल विभागाने जमीनदोस्त केले. उत्तन-गोराईमार्गावर न्यायिक अकादमीच्या पुढे गेल्यावर डोंगरावरील सरकारी जमिनी बळकावल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावतानाच आलिशान बंगले वा अन्य बांधकामे केली होती.
सरकारी जमीन बळकावणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानंतर तहसीलदार
भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार व तलाठी राहुल भोईर यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई
केली. सरकारी जमीन बळकावून बेकायदा बांधकाम करणाऱ्यांमध्ये अब्दुल रहीम, व्ही.सी. शाह,
नंदा सुखविंदर गिल, लालाभाई, रामदास पुजारी व अजबन दनेल डिसोझा यांचा समावेश आहे. त्यांची पक्की बांधकामे तोडल्याचे पवार म्हणाले. (प्रतिनिधी)