उल्हासनगरला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:39+5:302021-07-23T04:24:39+5:30

उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीकिनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतियानगर आदी परिसरातील शेकडो जणांना उल्हास नदीच्या पुराचा फटका बसला. शेकडो ...

Flood hit Ulhasnagar | उल्हासनगरला पुराचा फटका

उल्हासनगरला पुराचा फटका

Next

उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीकिनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतियानगर आदी परिसरातील शेकडो जणांना उल्हास नदीच्या पुराचा फटका बसला. शेकडो जणांच्या घरात पाणी घुसल्याने एकच धावपळ उडाली. लहान मुले, वृद्ध, महिला आदींना आपत्कालीन पथकांच्या जवानांनी रबरी बोटने बाहेर काढले.

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक धोका किनाऱ्यावरील झोपडपट्टीला असतो. मात्र बुधवारी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, दुर्गानगर आदी परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उल्हास नदीचे पाणी वालधुनी नदीत आल्याने करोतियानगर, प्रबुद्धनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरे नगरात घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पुराचे पाणी झोपडपट्टी परिसरात घुसल्याची माहिती मिळताच, पथकाने पुरात अडकलेल्या वृद्ध, महिला, लहान मुलासह नागरिकांना बाहेर काले. महापालिका शाळेमध्ये बेघर झालेल्या नागरिकांना ठेवण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली असून अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, टीव्ही व इतर इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले. आता जगायचे कसे, असा प्रश्न शेकडो नागरिकांसमोर उभा ठाकला असून शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांत वृद्ध, लहान मुले, आजारी नागरिकांची गैरसोय होत असून महापालिकेनेही मदतीसाठी पुढे येण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.

.....

सामाजिक संस्था व दानशूरांनी पुढे यावे.....उपमहापौर

शहरातील शेकडो रहिवाशांना पुराचा फटका बसला असून शासनासह सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येण्याचे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले. महापालिका पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसोबत असून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भालेराव म्हणाले.

Web Title: Flood hit Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.