फुलांच्या दरांची गुढी!

By admin | Published: April 8, 2016 01:41 AM2016-04-08T01:41:18+5:302016-04-08T01:41:18+5:30

पाणीटंचाईचा फटका फुलांच्या उत्पादनाला बसल्याने यंदा पाडव्यानिमित्त फुलांची आवक चांगलीच घटली आहे. परिणामी, फुलांचे दर दुपटीतिपटीने वाढले आहेत.

Flowering rate! | फुलांच्या दरांची गुढी!

फुलांच्या दरांची गुढी!

Next

ठाणे : पाणीटंचाईचा फटका फुलांच्या उत्पादनाला बसल्याने यंदा पाडव्यानिमित्त फुलांची आवक चांगलीच घटली आहे. परिणामी, फुलांचे दर दुपटीतिपटीने वाढले आहेत. त्यामुळे बाजारात फुलांना फारसा उठाव नसल्याचे विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पाणीटंचाईमुळे यंदा फुलांची आवक घटली आहे. पाडव्याला आवक तिप्पटचौपट होते. यंदा मात्र चित्र पूर्णपणे पालटल्याचे दिसले. वाढत्या दरामुळे
गिऱ्हाईकांचे फुले खरेदीचे प्रमाणही निम्म्यावर आल्याचे विक्रेते राजेश रावळ यांनी सांगितले. परिणामी, झेंडूच्या दराने शतक पार केले. दोन दिवसांपूर्वी मोगऱ्याचे गजरे १० रुपयांना तीन याप्रमाणे मिळत होते. परंतु, आता १५ रुपयांना एक या भावावर गेले. १५ रुपयांना एक मिळणारी गुलछडीची वेणी ५० रुपयांवर गेली. (प्रतिनिधी)
>फुलांची नावेआताचे दरआधीचे दर
पिवळा झेंडू६० रु. किलो१६ - १८ रु. किलो
कलकत्ता झेंडू६० ते ७० रु. किलो१५ - २० रु. किलो
बिजलीची फुले८० रु. किलो४० रु. किलो
अष्टर१०० रु. किलो५० - ६० रु. किलो
केशरी गोंडा५० रु. किलो२० रु. किलो
लाल कापडी१०० रु. किलो३० रु. किलो
गुलाब८० रु. डझन२० रु. डझन
मोगरा५०० रु. किलो२०० - २५० रु. किलो
तुळशीचे बंडल२० रु.१० रु
दूर्वा बंडल५ रु.२ रु
कडुनिंब५ - १० रु. जुडी२ रु. जुडी
गुलछडी२५० रु. किलो८० - १०० रु. किलो

Web Title: Flowering rate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.