कोरोनापाठोपाठ आता ठाण्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट, त्या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युमुळेच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:26 PM2021-01-11T17:26:41+5:302021-01-11T17:27:11+5:30
bird flu in Thane : मागील आठवडय़ात घोडबंदर भागात दोन ठिकाणी १६ पक्षी मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल आला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे - कोरोनाचे संकट आजही ठाण्यावर कायम असतांना आता ठाण्यावर बर्ड फ्युलचे संटक कोसळले आहे. मागील आठवडय़ात घोडबंदर भागात दोन ठिकाणी १६ पक्षी मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल आला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाण्यावर आता बर्ड फ्लुचे संकट उभे ठाकले आहे. यासाठी पालिकेने आता सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.
घोडबंदर पट्ट्यातील कावेसर या भागात विजय गार्डन आणि कोकणी पाडा येथील हिल गार्डन या परिसरात मागील आठवडय़ात बुधवारी सकाळी १६ पक्षी हे मृत अवस्थेत आढळल होते. त्यातील आठ पक्षी हे कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे उर्वरीत 8 पक्ष्यांचे अवशेष सुरक्षेचा उपाय म्हणून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये पोपट आणि पानबंगळ्याचा समावेश होता. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरीत चार पक्ष्यांचा अहवाल येणो बाकी आहे. परंतु ज्या पक्ष्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्यूमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन पानबगळे आणि एका पोपटचा समावेश आहे.
दरम्यान बर्ड फ्ल्यू च्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यात हाय अलर्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्रा मात्न या रोगाचा धोका नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु आता ठाण्यात आता बर्ड फ्ल्युने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यात ४ पक्ष्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाणोकरांना पालिकेने सावध राहण्याचा इशारा दिला असून अशा प्रकारे पक्षी मृतावस्थेत आढळल्यास पालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.