आरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल

By जितेंद्र कालेकर | Published: August 14, 2018 10:28 PM2018-08-14T22:28:38+5:302018-08-14T22:35:38+5:30

आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे.

Following the humiliation in front of the accused, the step of the women police officer in Thane | आरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल

कापूरबावडी पोलीस ठाण्यातील घटना

Next
ठळक मुद्दे कापूरबावडी पोलीस ठाण्यातील घटना आत्महत्येचा प्रयत्न रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

जितेंद्र कालेकर
ठाणे: ज्या आरोपींना अटकेचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिले होते. त्याच आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा त्यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, देशमुख यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना काही दिवस आरामाची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरेकर यांनी एका प्रकरणावरुन खडसावल्याने नैराश्येपोटी देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून दरेकर यांची तातडीने ठाणे शहर नियंत्रण कक्षात बदली केली आहे. एका हाणामारीच्याप्रकरणाचा तपास देशमुख यांच्याकडे होता. चार दिवस सतत प्रयत्न करुनही त्यांना ते आरोपी मिळाले नव्हते. यावरुन दरेकर यांनी त्यांना आधीही खडसावले होते. त्यात शुक्रवारी त्यांना पीएसओ (ठाणे अंमलदार) डयूटी असतांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर झाले. ते दरेकर यांच्यासमोर असतांना त्यांनी देशमुख यांना बोलावून घेतले. या आरोपींना अटक करा, असे त्यांनी आदेशदिले. पीएसओ डयूटी असल्यामुळे शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी त्यांना अटक करण्याचे सांगत त्यांना अटक करण्यास नकार दिला. यातूनच त्यांच्यात वादावादीही झाली. पीएसओ डयूटी असली तरी दिलेले आदेश अंमलात आणलेच पाहिजेत, असेही त्यांनी बजावले. त्यानंतर आरोपींसमोरच त्यांचा त्यांनी पाणउतारा केला. दरेकर यांचा पारा चढलेला असल्यामुळे त्यांनी देशमुख यांना चांगलेचफैलावर घेतले. त्यानंतरच संतापाच्या भरात देशमुख यांनी वर्तकनगर येथील घरी येऊन फिनाईल हे किटकनाशक प्राशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...............................
दरेकर यांच्याविरुद्ध याआधीही तक्रारी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर हे ३१ डिसेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये दरेकर यांची त्यांच्या जागी मुुंबईतून बदली झाली. नियुक्तीनंतर दुस-याच महिन्यात त्यांनी एका जमादाराला क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ केली होती. याबाबत त्या जमादाराने सहायक आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबाबतही त्यांची चौकशी झाली होती. तर अन्य एका प्रकरणात वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशी नोटीसही वरिष्ठ अधिका-यांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्यही एका उपनिरीक्षक महिलेने त्यांची महिनाभरापूर्वीच सहायक आयुक्तांकडे तोंडी तक्रार केली होती. याशिवाय, काही कर्मचा-यांशी त्यांचा वाद झाल्याने त्यांनी या पोलीस ठाण्यातून अन्यत्र बदल्या करुन घेतल्याचेही काही कर्मचारी आता दबक्या आवाजात बोलत आहे. दरम्यान, दरेकर यांचा स्वभाव तापट असला तरी त्यांनी कामाचा एक भाग म्हणूनच उपनिरीक्षक देशमुख यांना आदेश दिले होते. त्यामुळे देशमुख यांनीही टोकाची भूमीका न घेता सबूरीने घ्यायला हवे होते, अशीही चर्चा या पोलीस ठाण्यातील अधिकाºयांमध्ये आहे. .......................

‘‘ एका आरोपीला अटकेच्या सूचना उपनिरीक्षक देशमुख यांना दरेकर यांनी दिल्या होत्या. पण स्टेशन हाऊस डयूटी असल्यामुळे त्यांनी नकार दिला. यातूनच दरेकर त्यांना रागावले, अशी प्राथमिक माहिती आहे. पण याप्रकरणी सखोल नि:पक्ष चौकशी उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडून करण्यात येत आहे.’’

मधुकर पांडेय, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर
 

Web Title: Following the humiliation in front of the accused, the step of the women police officer in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.